Home /News /nashik /

राज्यात थंडीची लाट; बचावासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे झाला घात, नाशकात महिलेचा होरपळून मृत्यू

राज्यात थंडीची लाट; बचावासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे झाला घात, नाशकात महिलेचा होरपळून मृत्यू

Representative Image

Representative Image

Nashik Woman died due to bonfire : संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे ठिकठिकाणी आता शेकोट्या पेटवल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

नाशिक, 12 जानेवारी : उत्तर भारतासोबतच महाराष्ट्रातही थंडीची लाट (Cold wave in Maharashtra) पसरली आहे. संपूर्ण राज्य कडाक्याच्या थंडीने गारठल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आता तर एक अंकी (अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद होत असल्याचं पहायला मिळत आहे. थंडीपासून रक्षण व्हावे आणि ऊब मिळावी म्हणून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. मात्र, याच शेकोटीमुळे एका महिलेचा मृत्यू (Nashik woman died) झाल्याची धक्कादायक माहिती नाशिकमधून समोर आली आहे. (Nashik woman died after sustaining burn injuries while bonfire) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील गोदाकाठालगत असलेल्या वाघाडी परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. ही महिला आगीत होरपळली होती आणि तिच्या मृतदेहाच्या शेजारी शेकोटी होती त्यामुळे या महिलेचा शेकोटीमुळे होरपळून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. मृतक महिला कोण होती आणि तिचं नाव काय आहे याबाबत अद्याप माहिती सममोर आलेली नाहीये. पण शेकोटीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी तुम्ही शेकोटी पेटवत असाल तर नक्कीच काळजी घ्या. VIDEO: सातपुड्यात पारा घसरला; तापमानाचा पारा घसरल्याने बर्फाची चादर पसरल्याचं चित्र मराठवाडा - विदर्भात पावसाची शक्यता राज्यात थंडीची लाट सुरू असतानाच अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होताना दिसत आहे. आता मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भात 12-14 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पावसांची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आणि पाचगणीत हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. महाबळेश्वरात आज पहाटे तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसजवळ जावून पोहोचला होता. त्यामुळे महाबळेश्वरात दवबिंदू गोठतील अशी स्थिती निर्माण झाली होती. अचानक गारठा वाढल्याने अनेकांनी शेकोटी पेटवून स्वत:चा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. आज पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ नोंदला गेला आहे. पाचगणीत देखील किमान तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. खरंतर, दरवर्षी डिसेंबर महिन्यात वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठत असतात. पण यावर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अशात आज पहाटे महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ पोहोचला आहे. त्यामुळे दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली होती.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra, Nashik, Winter

पुढील बातम्या