मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर, ‘फायरिंग रेंज’च्या निमित्तानं शहरात वातावरण निर्मिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर, ‘फायरिंग रेंज’च्या निमित्तानं शहरात वातावरण निर्मिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) सोमवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर जाणार असून तिथे महाराष्ट्र पोलीस अकादमीत (Maharashtra Police Academy) विविध उपक्रमांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

  • Share this:

नाशिक, 8 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) सोमवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर जाणार असून तिथे महाराष्ट्र पोलीस अकादमीत (Maharashtra Police Academy) विविध उपक्रमांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील उपस्थित असणार आहे.

दौऱ्यांची लगबग

महाराष्ट्र दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सुरु झालेले राजकीय नेत्यांचे दौरे आता सुरुच राहणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. नुकताच राज ठाकरे यांचा दौरा, त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांचा दौरा, राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंची नाशिक भेट यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

महापालिका निवडणुकांची वातावरण निर्मिती

पुढील वर्षी राज्यातील 10 महानगपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात वेगळी राजकीय समीकरणं मांडलेली दिसणार आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे शिवेसनेनं भाजपची साथ सोडल्यामुळे वेगळे राजकीय समीकरण तयार झाले आहे. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळाची भाषा केल्यामुळे भविष्यात नेमकी राजकीय समीकरणं काय असणार, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याकडेदेखील त्याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे.

हे वाचा -दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा वाढवली, बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर अलर्ट

असा आहे नियोजित कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस अकादमीतील कंपोझीट इनडोअर फायरिंग रेंजचं उद्घाटन होणार आहे. त्याशिवाय सिंथेटिक टँक, ऍस्ट्रोटर्फ फुटबॉल आणि हॉकी मैदान, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल मैदान, आणि निसर्ग उद्यान यांचे उद्घाटनही होणार आहे.

Published by: desk news
First published: August 8, 2021, 6:51 PM IST

ताज्या बातम्या