मराठी बातम्या /बातम्या /nashik /

नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले विना मास्क, पहिल्यांदाच मास्कविना जनतेला केलं संबोधित

नाशिकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले विना मास्क, पहिल्यांदाच मास्कविना जनतेला केलं संबोधित

सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी नाशिक (Nashik) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियमांचं (Corona Rules) पालन केलं नसल्याचं दिसून आलं.

  • Published by:  Pooja Vichare

नाशिक, 10 ऑगस्ट: सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी नाशिक (Nashik) दौरा केला. या दौऱ्या दरम्यान चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे नियमांचं (Corona Rules) पालन केलं नसल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील अत्याधुनिक सोयीसुविधांचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमात भाषणा दरम्यान मुख्यमंत्री विना मास्क (Without Mask) दिसले.

कोविड 19 च्या नियमांनुसार सार्वजनिक स्थळी फेस मास्क घालणं हा महत्त्वाचं असून अनिवार्य आहे. हा नियम 2020 मध्ये लागू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. मात्र तरीही भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर फेस मास्क दिसला नाही.

आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, हा माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे. जिथे मी विना मास्क जनतेला संबोधित करत आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा विना मास्क सार्वजनिक कार्यक्रमात जनतेला संबोधित केलं आहे.

मुंबईतल्या गणेशोत्सवासंदर्भात आज काय होणार निर्णय?, महत्त्वाच्या बैठका

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार सहकार्य करेल.

माझे राज्य पुढे कसे जाईल हा विचार करणे ही संघभावना आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने अशी संघभावना कायम राखत देशात लौकिक प्रस्थापित केला असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत.

First published:

Tags: Cm, Nashik, Uddhav thackeray, Uddhav Thackeray (Politician)