Home /News /nashik /

शरद पवारांची अ‍ॅलर्जी असल्याचं कारण नाहीये, पडळकरांच्या विधानावर छगन भुजबळांचं वक्तव्य

शरद पवारांची अ‍ॅलर्जी असल्याचं कारण नाहीये, पडळकरांच्या विधानावर छगन भुजबळांचं वक्तव्य

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन छगन भुजबळ यांनी एक बैठक घेत संप मिठवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनीही संपातून माघार घेतली. मात्र, यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. त्यानंतर यावर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
    नाशिक, 11 जानेवारी : राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Trasnport) अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत कामगार संघटना, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) सुद्धा उपस्थित होते. या बैठकीनंतर कामगार संघटनांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. ST आणि जनतेला वेठीला धरून कुणाचाही फायदा होणार नाही, अशी भूमिका कामगार संघटनेनं मांडली. यावरुन भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यावर आता छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांची अ‍ॅलर्जी कुणालाच असल्याचं कारण नाहीये. कारण आज महाराष्ट्रातील नाही तर देशातील असे नेते आहेत त्यांच्या मताला, अनुभवाला किंमत आहे. राज्यात जेव्हा प्रश्न सुटत नाही तेव्हा महाविकास आघाडीतील एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना काळजी वाटणे स्वाभावीक आहे. गिरणी कामगारांचा संप अजूनही संपल्याचं कुणीच जाहीर केलेलं नाहीये. एसटी संपाबाबत इतका अट्टहास करणं योग्य नाहीये. कामगारांना समजावून सांगणे हा परवारांचा हक्क आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मार्गदर्शन करण्याचं शरद पवारांच काम आहे. त्यामध्ये अ‍ॅलर्जी असण्याचं इतरांना कारण नाहीये. महाविकास आघाडी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पद्धतीने प्रयत्न करेल. वाचा : गिरीश महाजनांच्या अडचणीत?, जळगावात गेलेल्या पुणे पोलिसांनी टेम्पोभर कागदपत्रे घेतली ताब्यात काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर ? सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी एकजूटीनं लढा दिला. कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरदचंद्र पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पडले आहे. मला मंत्री अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? स्वत: भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. तसेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की, मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा असे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. विलिनीकरणाची शक्यता नाही पण...-शरद पवार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर शरद पवार म्हणाले की, कोरोनाचा नवा अवतार आपण गेले काही दिवस पाहात आहोत. कृती समितीच्या सदस्यांनी त्यांच्या मागण्या सांगितल्यात. ST चालू झाली पाहिजे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी सेवेत परत यायला हवं. कृती समितीमधील 22 संघटनांच्या प्रतिनिधींनी कामगार आणि प्रवाशांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. कामगार संभ्रमात होते म्हणून हा 2 महिन्यांचा वेळ लागला. 'विलिनीकरणाची शक्यता नाही हे राज्य सरकारने सांगितलं आहे, पण त्यात सुधारणा आहे का? हा प्रश्न आता न्यायालयात आहे. तिथे काय निर्णय होतोय तो सर्वांना बांधिल राहील. एखाद्या राजकीय पक्षाने काहीही भूमिका घेतली तर आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नांशी बांधिल राहीलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Chagan bhujbal, Gopichand padalkar, Sharad pawar

    पुढील बातम्या