मराठी बातम्या /बातम्या /nashik /केमिकल टँकर आणि ट्रकची धडक, भीषण आग लागून 2 जणांचा होरपळून मृत्यू

केमिकल टँकर आणि ट्रकची धडक, भीषण आग लागून 2 जणांचा होरपळून मृत्यू

 सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौळाने जवळ ही घटना घडली.

सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौळाने जवळ ही घटना घडली.

सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौळाने जवळ ही घटना घडली.

 मनमाड, 1 जून : आयशर ट्रक आणि केमिकल टँकरची (Chemical tanker) धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागल्याची घटना मनमाड-मालेगाव मार्गावर घडली. या भीषण आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दोन्ही वाहने जळून झाली खाक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौळाने जवळ ही घटना घडली.

केमिकल घेऊन जाणारा टँकर आणि आयशर ट्रक यांच्यात अचानक समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर   दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला.  हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहने जळून खाक तर झालीच शिवाय 2 जणांचा होरपळून मृत्यू  झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मेहुल चोक्सीसोबत डोमिनिकामध्ये आढळलेली महिला गर्लफ्रेंड नाही? नवी माहिती समोर

केमिकल टँकर पुणे येथून राजस्थानकडे जात होता तर आयशर ट्रक  मनमाडकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

62 वर्षांच्या मेहुल चोक्सीची कथित गर्लफ्रेंड आहे हॉट;PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावरील  सुमारे 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर केमिकल टँकरला आग लागली आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आयशर ट्रक देखील आगीच्या विळख्यात सापडून दोन्ही वाहने जळून खाक झाली.

First published:
top videos