अवघ्या काही सेकंदाने झाले बाजूला अन् कार आदळली टेम्पोवर, येवल्यातील अपघाताचा LIVE VIDEO

अवघ्या काही सेकंदाने झाले बाजूला अन् कार आदळली टेम्पोवर, येवल्यातील अपघाताचा LIVE VIDEO

येवला-विंचूर चौफुलीवर ही घटना घडली असून या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

  • Share this:

मनमाड, 14 सप्टेंबर : 'देव तारी त्याला कोण मारी', असं आपण नेहमी म्हणत असतो. या म्हणीचा प्रत्यय नाशिक (nashik) जिल्ह्यातील येवल्यामध्ये आला आहे. भरधाव वेगाने जाणारी कार (car) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर (tempo) जाऊन आदळली. नेमकं त्याचवेळी एका प्रवाशाने अवघ्या काही सेकंदात बाजूला झाला त्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv video) कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येवला-विंचूर चौफुलीवर ही घटना घडली असून या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कार भरधाव वेगाने जात असताना वळणार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर जाऊन आदळली.

धडक इतकी जबर होती की, टेम्पोत बसलेल्या महिला बाहेर फेकल्या गेल्या. या अपघातात टेम्पो मधील 4 ते 5 जण आणि कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना येवल्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी पैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

ज्यावेळी ही कार टेम्पोवर धडकली तेव्हा काही जण हे रस्त्याच्या बाजूला टेम्पो शेजारीच उभे होते. जेव्हा टेम्पोच्या बाजूला काही जण उभे होते. नेमकं त्याचवेळी त्यांनी समोरून भरधाव येणारी कार दिसली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता लगेच बाजूला झाले अन् त्याचवेळी कारही टेम्पोला धडकली. अवघ्या काही सेकंदामुळे त्यांनी आपला जीव अगदी थोडक्यात वाचवला.

रस्त्यावरील खांबाला हात लावताच 6 वर्षांच्या मुलाला विजेचा झटका;घटनेचा Live Video

टेम्पोमधील प्रवासी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पिंपरखेड येथील असून ते नाशिक रामकुंडावर अस्थी विसर्जनासाठी गेले होते. परतीच्या मार्गावर येवला येत असताना रस्त्याच्या बाजूला थांबले होते. तेव्हा हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 14, 2021, 7:19 AM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या