मराठी बातम्या /बातम्या /nashik /महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी, नाशिकमध्ये Delta Variant चे 30 रुग्ण आढळले!

महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी, नाशिकमध्ये Delta Variant चे 30 रुग्ण आढळले!

नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे.

मुंबई, 06 ऑगस्ट : कोरोनाच्या (COVID-19) लाट ओसरली असल्यामुळे 22 जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात डेल्टा व्हेरियंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शुन्यावर आली होती. पण, आता नाशिकमध्ये (nashik) डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केला आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण 155 सॅपल्स तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे.  सर्व रुग्ण हे आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली आहे.

दरम्यान, जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर राज्य सरकारने 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात होती. अखेरीस राज्य सरकारच्या या लढ्याला जुलै महिन्यात यश आले होते. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 'राज्यात कुठे ही  डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून 100 नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही' असं जाहीर सुद्धा केलं होतं. पण, आता नाशिकमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे डेल्टा प्लस कोरोना?

डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.

दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,‘ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता.

First published:
top videos