बीडनंतर नाशिकमध्येही मोठी दुर्घटना; सहा जणांचा नदीत बुडून मृत्यू

बीडनंतर नाशिकमध्येही मोठी दुर्घटना; सहा जणांचा नदीत बुडून मृत्यू

नाशिक शहरातील सिडकोच्या सिंहस्थनगरमध्ये राहणाऱ्या सहाजणांचा शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

  • Share this:

नाशिक, 16 एप्रिल : नाशिक शहरातील सिडकोच्या सिंहस्थनगरमध्ये राहणाऱ्या सहाजणांचा शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांना एका मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

सिंहस्थनगरमधील नऊजण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी वालदेवी नदी परिसरात फिरण्यास गेले होते.

सायंकाळी सहा वाजेदरम्यान सर्वजण पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी उभे होते. त्यावेळी पाण्यात तोल जावून काहीजण पडले. पोहता येत नसल्याने सर्वांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. पोहता येत नसल्याने सहाजण पाण्यात बुडाले. सायंकाळी 7 वाजेनंतर अंधार झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला आहे.

हे ही वाचा-कोरोनाच्या कहरात बीडमधील कुटुंबावर शोककळा; पोहोण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

घटनास्थळी वाडीवर्‍हे पोलीस, तहसीलदार आणि अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर दाखल केले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरु केलं आहे.

आज बीडमध्येही तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. नाळवंडी रस्त्यावर असलेल्या खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. अथक परिश्रमानंतर पोलिसांना तिघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यश आलं आहे. बीड शहरातील गांधी नगर येथील मयूर राजू गायकवाड, ओंकार गणेश जाधव, शाम सुंदरलाल देशमुख आणि अन्य एक जण बीड-नाळवंडी रोडवरील नखातेच्या खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र यादरम्यान या तिघांचाही खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर या तिघांचेही वय 17 ते 20 दरम्यान असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस पुढीस तपास करत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: April 16, 2021, 10:45 PM IST
Tags: nashik

ताज्या बातम्या