मुंबई, 23 ऑगस्ट : नाशिक (Nashik ) जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर (Dr. Vaishali Zankar-Vir) यांना 8 लाखांच्या लाच प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. पण दुसरीकडे, झनकर यांच्यावर निलंबनाची अखेर कारवाई करण्यात आली आहे.
डॉ वैशाली झनकर-वीर तब्बल 8 लाखांची लाच घेतल्यामुळे नाशकात एकच खळबळ उडाली होती. वैशाली झनकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयातून जामीन मिळाल्यामुळे दिलासा मिळाला होता. परंतु, दर सोमवारी झनकर यांना ACB कार्यालयात हजेरी बंधनकारक असणार आहे.
घरातून येत होती दुर्गेंधी, पोलिसांनी दार उघडून पाहिले आणि...
वैशाली झनकर यांना जिल्हा सत्रन्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन वेळा निलंबनाचा प्रस्ताव पाठवून ही निलंबन होत नसल्याने शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
लाचखोर प्रकरणात पोलीस आणि न्यायालयीन कोठडी सुनवल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता झनकर यांना निलंबनाच्या कालावधीत खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव असणार आहे.
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई इथे नोकरीची संधी; इथे करा अप्लाय
वैशाली झनकर वीर यांच्या कृत्यामुळे सरकारची प्रतिमा मलील झाली. त्यामुळे त्यांच्यावर सरकारकडून निलंबन करण्यात येणार असल्याण्याची दाट शक्यता होती. त्यांच्याविरोधात सेवा तरतुदीनुसार शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दुसरीकडे निलंबन प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना आदेश सुद्धा दिले होते. अखेर, आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गोळा केली कोट्यवधीची माया
वैशाली झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नर येथे 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे, अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे म्हणजेच सुमारे 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. 40 हजारांची रोख रक्कम आढळली असून एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहनं होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.