नाशिक-हैद्राबाद फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन; सर्च ऑपरेशननंतर धक्कादायक प्रकार उघड

नाशिक-हैद्राबाद फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन; सर्च ऑपरेशननंतर धक्कादायक प्रकार उघड

अखेर पोलिसांनी निनावी फोन करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे

  • Share this:

नाशिक, 27 मार्च : नाशिक-हैद्राबाद फ्लाइटमध्ये बॉम्ब (Nashik-Hydrabad flight bomb) असल्याच्या अफवेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पोलिसांना फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करीत ऑपरेशन सुरू केलं होतं. यासाठी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. या फ्लाइटमध्ये 25 ते 30 प्रवासी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पटापट कारवाई सुरू केली. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच फ्लाइटचे टेक ऑफही थांबविण्यात आले.

मात्र तपासानंतरही बॉम्ब सापडला नसल्याने पोलीस यंत्रणेने निनावी फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर धक्कादायक बातमी समोर आली आहे. विमानात सीट न मिळाल्याने या व्यक्तीने पोलिसांनी निनावी फोन करीत बॉम्बची अफवा पसरवली होती. या व्यक्तीनी केलेल्या या प्रतापामुळे पोलीस यंत्रणेला नसता त्रास सहन करावा लागला. सीट न मिळाल्याच्या रागाने या व्यक्तीने फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचा निनावी फोन करून फ्लाइटचं टेक ऑफचं थांबवलं.

हे ही वाचा-नाशकात कोरोनाचा धक्कादायक प्रसार; दाहकता वाढली, परंतु नेमकं चुकतंय कुठे?

आधीच कोरोनामुळे नागरिकांच्या आणि पोलीस यंत्रणेच्या नाकी नऊ आले असताना अशा कृत्यामुळे पोलिसांचा मनस्ताप झाला. आज नाशिक जिल्ह्यात एकाच दिवसात 4 हजार 998 जणांचे अहवाल पॉजिटिव्ह आले असून गेल्या अनेक दिवसांपासून ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नाशिक-हैद्राबादमधील हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेच्या चिंतेत अधिक भर पडली. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोरोनाव्हायरसचा प्रकोप राज्यात प्रचंड वाढल्यानंतर आणि आवाहन करूनही लोकांची गर्दी कमी होत नाही, हे लक्षात आल्यानंतर राज्याने Mission Begin again अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. आजपासूनच (27 मार्च मध्यरात्रीपासून) हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. पाच जणांपेक्षा अधिक माणसांनी एकत्र बाहेर पडण्यावर बंदी आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: March 27, 2021, 11:01 PM IST

ताज्या बातम्या