आई दरवाजा उघडत नसल्यानं चिमुकलीनं गाठलं पोलीस ठाणं; 5 वर्षीय लेकीमुळे वाचले माऊलीचे प्राण

आई दरवाजा उघडत नसल्यानं चिमुकलीनं गाठलं पोलीस ठाणं; 5 वर्षीय लेकीमुळे वाचले माऊलीचे प्राण

Nashik News: दरवाजा ठोठावला, हाका मारल्या तरीही आई दार उघडत नाहीये, म्हणून भेदरलेल्या अवस्थेत एका चिमुकलीनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन मदत मागितल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक, 14 ऑगस्ट: दरवाजा ठोठावला, हाका मारल्या तरीही आई दार उघडत नाहीये, म्हणून भेदरलेल्या अवस्थेत एका चिमुकलीनं थेट पोलीस ठाण्यात जाऊन मदत मागितल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे 5 वर्षीय चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे तिच्या आईचा जीव वाचला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीनं मदत मागितल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संबंधित महिलेचा देह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला पोलिसांना दिसला. यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करत देह खाली घेतला आणि पाठीवर पंप केल्यानं महिलेचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला.

संबंधित घटना शुक्रवारी दुपारी नाशिक येथील गंजमाळमधील भीमवाडीत घडली आहे. संबंधित आत्महत्या करणारी महिला याठिकाणी आपला पती आणि मुलासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी घरी कोणी नसताना त्यांनी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. संबंधित गतप्राण झाली असावी असं पोलिसांनाही प्रथमदर्शीनी वाटलं होतं. पण पोलिसांनी तातडीनं गळफासाचा दोर कापून महिलेला खाली उतरवलं. महिलेला खाली उतरवल्यानंतर पाठीवर पंप केल्यानं त्यांचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीनं त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

हेही वाचा-बुडणाऱ्या जिजाला वाचवण्याऐवजी मेहुणा गेला पळून, दारूच्या नशेत नात्याचाही विसर

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी दुपारी 5 वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत होती. दरम्यान घरात कोणीच नव्हतं. हे पाहून संबंधित महिलेनं अचानक घराचा दरवाजा लावून घेतला. आईनं दरवाजा का लावून घेतला याबद्दल चिमुकलीला पुसटशी कल्पनाही नव्हती. यामुळे आईनं दार उघडावं म्हणून ती बरेच प्रयत्न करत होती. तिने दरवाजा ठोठावला, हाका मारल्या पण आतून काही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे 5 वर्षीय चिमुकलीला काय करावं काहीच सुचेना.

हेही वाचा-धुळ्याला जाण्यासाठी uber कार बुक केली, चालकाला संपवले पण fastag ने अडकवले!

यामुळे संबंधित मुलीनं मदतीसाठी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. काहीतरी करा हो, माझी आई दार उघडत नाही, अशा शब्दांत मुलीनं पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनीही क्षणभरही विलंब न करत घराकडे धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, महिलेचा देह लटकलेल्या अवस्थेत आढळला. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि पोलिसांनी तातडीनं कारवाई केल्यानं महिलेचा प्राण वाचला आहे. आणखी थोडा उशीर झाला असता, तर चित्र काहीसं वेगळं असतं, अशी भावना स्थानिकांनी बोलून दाखवली आहे.

Published by: News18 Desk
First published: August 14, 2021, 7:58 AM IST

ताज्या बातम्या