मराठी बातम्या /बातम्या /nashik /

...तर नारायण राणेंबद्दल विचार करावा लागेल, नाशिक पोलीस आयुक्तांनी केलं स्पष्ट

...तर नारायण राणेंबद्दल विचार करावा लागेल, नाशिक पोलीस आयुक्तांनी केलं स्पष्ट

 'आम्ही न्यायलायाच्या आदेशच पालन करणार आहोत. तसंच, राणेंच्या अटकेचा आदेश योग्यच होता आणि आमचा हेतू स्पष्ट होता'

'आम्ही न्यायलायाच्या आदेशच पालन करणार आहोत. तसंच, राणेंच्या अटकेचा आदेश योग्यच होता आणि आमचा हेतू स्पष्ट होता'

'आम्ही न्यायलायाच्या आदेशच पालन करणार आहोत. तसंच, राणेंच्या अटकेचा आदेश योग्यच होता आणि आमचा हेतू स्पष्ट होता'

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 25 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जामीन मिळाला आहे. नारायण राणे यांनी नाशिक पोलिसांनी आपल्याविरोधात घाईघाईने कारवाई केली आहे, असा आरोप केला आहे. पण, तक्रार दाखल झाल्यानंतर कायदेशीररित्या कारवाई करण्यात आली आहे. त्यांना 2 तारखेला नाशिक पोलिसांसमोर हजर राहायचे आहे, असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (nashik police commissioner deepak pandey) यांनी स्पष्ट केलं.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला होता. पण, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राणेंचे सर्व आरोप फेटाळून लावले.

'आमच्यावर कुठलाही दबाव नव्हता. आमच्याकडे लेखी तक्रार आली. ती योग्य असल्यामुळेच पुढील कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये आमच्यावर कुणाचाही दबाव नव्हता. अशा प्रकरणात पोलीस कुणाच्याही दबावाला बळी पडत नाही. कायदेशीर रित्या कारवाई केली जाते, याही प्रकरणात तीच आमची भूमिका होती, असं पांडे यांनी ठणकावून सांगितलं.

आणखी एका महासाथीचं संकट, कोरोनापेक्षाही भयंकर असणार; तज्ज्ञांनी केलं अलर्ट

'नारायण राणे यांना २ तारखेंला हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यांना नाशिकच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी यावे लागणार आहे. त्यामुळे ते एक जबाबदार नागरिक असून देशाचे केंद्रीय मंत्री आहे. त्यामुळे याचं ते पालन करतील. जर राणे हजर झाले नाहीतर त्यावेळी विचार करू, असंही दीपक पांडे यांनी सांगितलं.

'राणेंच्या विरोधात तीन कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे. तक्रारदाराने जी तक्रार नोंदवली, त्यानुसार ती योग्य असल्याचे आमच्या निदर्शनास आहे. गेल्या 22 वर्षांचा आम्हाला हा अनुभव आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तो तसाच कायम राहणार आहे. आम्ही घाई गडबडीने गुन्हा दाखल केला नाही, यात अजिबात घाई झालेली नाही. उलट उशीरा गुन्हा दाखल झाला तर आम्हाला जबाब द्यावा लागतो, असंही पांडे म्हणाले.

भयंकर! मेल्यानंतर 20 मिनिटांनी नाग झाला जिवंत; शेफला दंश; वाचून अंगावर येईल काटा

तसंच, हायकोर्टाने आदेश दिले आहे. पुढील सुनावणी ही 17 सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत त्यांनी उपस्थित राहायचे की नाही हा राणे साहेबांचा विषय आहे. आम्ही कारवाई करणार नाही. आम्ही न्यायलायाच्या आदेशच पालन करणार आहोत. तसंच, राणेंच्या अटकेचा आदेश योग्यच होता आणि आमचा हेतू स्पष्ट होता. आम्ही तातडीने अॅक्शन घेणार नाही. नारायण राणे यांच्याविरोधात पूर्ण कायदेशीररित्या कारवाई योग्यच होती, असंही नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केलं.

First published: