Home /News /nashik /

नाशकात कारची एकमेकांना टक्कर, धडकेत 5 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; 7 जखमी

नाशकात कारची एकमेकांना टक्कर, धडकेत 5 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; 7 जखमी

सकाळी सकाळी नाशकातून (Nashik city) एक अपघाताची (accident)बातमी समोर येतेय. नाशिक शहरातील एबीबी सिग्नल येथे दोन कारची एकमेकांना टक्कर झालीय.

नाशिक, 18 एप्रिल: सकाळी सकाळी नाशकातून (Nashik city) एक अपघाताची (accident)बातमी समोर येतेय. नाशिक शहरातील एबीबी सिग्नल येथे दोन कारची एकमेकांना टक्कर झालीय. या धडकेतून दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 1 वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. या भीषण अपघातात 5 वर्षांचा मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही कारमधील एकूण 7 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींपैकी काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. अपघातानंतर जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कसा झाला अपघात या अपघातात महिंद्रा झायलो कार (MH1DC9746) आणी मारुती ब्रीझा (MH15GL3461) या दोन कारमध्ये टक्कर झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही कार उलटल्या आणि प्रवासी बाहेर फेकले गेले. अपघातात दोन्ही कारच मोठं नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. या अपघाताप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या