Home /News /nashik /

Aaditya Thackeray: राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर शिवसेनेचा पवित्रा, आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार

Aaditya Thackeray: राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर शिवसेनेचा पवित्रा, आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार

राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर शिवसेनेचा पवित्रा, आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार

राज ठाकरेंच्या आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर शिवसेनेचा पवित्रा, आदित्य ठाकरे अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात आहे.

  लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 16 एप्रिल : शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केली आणि तेव्हापासून भाजपकडून हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन शिवसेनेला (Shiv Sena) घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळे भाजपसोबतच मनसेकडूनही शिवसेनेला एकप्रकारे घेरण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून एक नवी खेळी खेळण्यात येत असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यात या अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे आयोध्येला जाणार आहेत. या पूर्वी उद्धव ठाकरे हे संपूर्ण परिवारासह अयोध्याच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्या दौऱ्याचं नियोजन नाशिक पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं होतं. तर हिंदुत्वाचा मुद्दा हादी घेतलेल्या राज ठाकरे यांनी जय हनुमान म्हणत आज हनुमान चालिसा पठण कार्यक्रम हाती घेतला असताना आता शिवसेनेकडून जय श्रीराम म्हणत अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. भोंग्यांच्या भूमिकेवरुन काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंचा टोला मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली. त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत राज ठाकरेंनी राज्य सरकारला अल्टिमेटम देत म्हटलं, 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे मौलवींसोबत चर्चा करुन हटवावे अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात येईल. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन अनेक प्रतिक्रिया येत असतानाच आता राज ठाकरेंचे पुतणे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटतं या विषयावर जास्त टिप्पणी करायची नाहीये. यापेक्षा भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दलही जर जनतेला महागाईबद्दल सांगता आलं तर ते सुद्धा सांगावं. पेट्रोल-डिझेल, सीएनजीच्या या किमती इतक्या का वाढल्या आहेत. ही दरवाढ कशामुळे का झाली आहे. साठ वर्षांपूर्वी न जाता गेल्या दोन-तीन वर्षांत हे का झालं आहे? हे सुद्धा सांगावं असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपले काका राज ठाकरे यांना डिवचलं आहे.

  तुमच्या शहरातून (नाशिक)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Aaditya thackeray, Ayodhya, Raj Thackeray

  पुढील बातम्या