Home /News /nashik /

नाशिक: व्यायाम करताना गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू, असा गेला तोल

नाशिक: व्यायाम करताना गच्चीवरून पडून महिलेचा मृत्यू, असा गेला तोल

नाशिकमध्ये व्यायाम करताना गच्चीवरून पडल्यामुळे एका (A woman dies after falling from terrace) महिलेचा मृत्यू झाला आहे.

    नाशिक, 13 ऑक्टोबर : नाशिकमध्ये व्यायाम करताना गच्चीवरून पडल्यामुळे एका (A woman dies after falling from terrace) महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला सकाळच्या वेळी दररोज इमारतीच्या गच्चीवर व्यायाम करण्यासाठी (Fell down from terrace while doing exercise) जात असे. सकाळी उठल्यानंतर अगोदर गच्चीवर जाणे, व्यायाम करणे, योगा करणे आणि मग दिनक्रमाला सुरुवात करणे, असा तिचा शिरस्ता होता. मात्र घटनेच्या दिवशी महिलेचा तोल गेला आणि ती गच्चीवरून खाली पडली. अशी घडली दुर्घटना नाशिकमध्ये अशोकस्तंभ परिसरात प्रिया सतीश मटुमल ही महिला कुटुंबासोबत राहत होती. रोजच्याप्रमाणे ती सकाळी उठून व्यायाम आणि योगा करण्यासाठी गच्चीवर गेली. मात्र गच्चीवर व्यायाम सुरू असताना तिचा अचानक तोल गेला. या गच्चीत ज्या भागात प्रिया व्यायाम करत होती, तिथे कठडा नसल्याची प्राथमिक माहिती आहे. व्यायाम करताना अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती गच्चीवरून थेट खाली कोसळली. उपचारादरम्यान झाला मृत्यू तोल गेल्यानंतर प्रियाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. गच्चीवरून थेट खाली पडू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यावेळी तिच्या हाती काहीच लागलं नाही. तोल गेल्यामुळे ती सरळ गच्चीवरून जमिनीवर आपटली . या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रियाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. या घटनेनं गटुमल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे वाचा - मुंबईत जळीतकांडाने खळबळ; 25 ते 30 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या, LIVE VIDEO व्यायाम करताना घ्या काळजी अनेकजण गच्चीवर व्यायाम करत असतात. मात्र गच्चीवर ज्या भागात आपण व्यायाम करत आहोत, तिथे सुरक्षित कठडा आहे ना, याची खातरजमा करणं गरजेचं आहे. जर गच्चीला कठडा नसेल, तर शक्यतो गच्चीच्या मध्यभागी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायाम करताना अनेकदा तोल जाण्याची शक्यता असते. मात्र गच्चीला कठडा नसेल, तर काही क्षणांत होत्याचं नव्हतं होण्याची शक्यता असते
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Death, Nashik

    पुढील बातम्या