नाशिक, 10 ऑगस्ट : पाहुण्या म्हणून आलेल्या महिलेस घरात घुसून एकाने मारहाण करीत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नाशिक (nashik) जिल्ह्यातील मखमलाबाद रोड (Makhmalabad Road) भागात घडली आहे. या घटनेत सख्या बहिणी (sisters) जखमी झाल्या असून पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पंचवटी पोलिसांनी (panchavati police station nashik) दिलेल्या माहितीनुसार, भारती गौड (Bharti Gaud) (55) आणि सुशिला गौड (65) (sushil gaud) अशी भाजलेल्या महिलांची नावे आहेत. प्रदीप ओमप्रकाश गौड हे शिंदे नगर भागातील भाविक बिलाजियो या इमारतीत आपल्या कुटुंबासह राहतात. मंगळवारी (10 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास गौड यांच्या मावशी भारती या त्यांच्या घरी आल्या.
दोघी बहिणी आपले वयोवृद्ध वडील जानकीदास गौड यांच्याशी गप्पा मारत होते. त्याचवेळी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रिक्षाचालक कुमावत तेथे अचानकपणे आला. कुमावत हा गौड कुटुंबाचा परिचीत आहे. त्याने मावशी भारती गौड यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संतप्त झालेल्या कुमावत याने काही कळण्याच्या आत बाटलीत आणलेले पेट्रोल भारती गौड यांच्या अंगावर ओतले.
तसंच, त्यांना पेटवून देत पोबारा केला. या घटनेत सुशिला गौड याही आपल्या बहिणीस वाचवण्याच्या प्रयत्नात भाजल्या आहेत. आरोपीच्या म्हणण्यानुसार, यातील भारती गौड या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र ती त्याला वेळ देत नसल्याने त्याने आज तिला तिच्या घरात घुसून जाळले. या वेळी तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी केलेल्या तिच्या बहिणीलाही त्याने पेटवले.
वयोवृद्ध वडील जानकीदास गौड, पार्थ गौड (15) व चिराग गौड (3) ही बालके बालंबाल बचावली आहेत. चिमुकल्या पार्थ गौड याने वेळीच बेडरूममध्ये धाव घेत आपल्या आई-वडिलांशी संपर्क साधल्याने ही घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे.
पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला आहे. वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.