मराठी बातम्या /बातम्या /nashik /

माता न तू वैरणी, 10 वर्षांच्या चिमुरड्याचा गुप्तांगाला दिले चटके

माता न तू वैरणी, 10 वर्षांच्या चिमुरड्याचा गुप्तांगाला दिले चटके

दोघा भावंडांच्या भांडणामुळे रागावलेल्या सावत्र आईने हे निर्दयी कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

दोघा भावंडांच्या भांडणामुळे रागावलेल्या सावत्र आईने हे निर्दयी कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

दोघा भावंडांच्या भांडणामुळे रागावलेल्या सावत्र आईने हे निर्दयी कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 08 जून :  नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे गावात एका क्रूर आईने (Mother) आपल्या मुलाच्या गुप्तांगाला चटके दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या क्रुर आईच्या विरोधात पोलिसांत (Dindori Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

10 वर्षे वय म्हटलं की खेळण बागडण्याचं वय. हेच मुलांचं बऱ्यापैकी काम असतं. मात्र या मुकबधीर मुलाला आपल्या सावत्र आईनेच किरकोळ कारणातून जबर मारहाण केली. बरं ही आई मारहाण करण्यापर्यंत थांबलेली नाही. तर मुलाच्या गुप्तांगाला ही चटके दिल्याचा अमानवीय प्रकार ही या आईने केल्याची माहिती आहे. त्यामुळे आई, म्हणावं की काय ? असा प्रश्न सध्या समोर येतोय. या मुलावर सद्या नाशिकच्या जिल्हा रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

Income tax च्या नव्या वेबसाईटमध्ये समस्या, निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया

घडलेला प्रकार हा खरच गंभीर असल्याचं लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत सावत्र आईला अटक केली आहे.

जम्मू-काश्मीर: माता वैष्णोदेवी भवनाजवळ भीषण आग; पाहा VIDEO

दोघा भावंडांच्या भांडणामुळे रागावलेल्या सावत्र आईने हे निर्दयी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, वडिलांनीच याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन मदत केल्याने मुलाचे प्राण वाचले. मात्र, चिमुरड्याला केलेल्या या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

First published: