मराठी बातम्या /बातम्या /nashik /नाशिक पुन्हा हादरलं! चौथीतील मुलीवर दोघांकडून अत्याचार, कुटुंब शेतात जाताच नराधमांनी साधला डाव

नाशिक पुन्हा हादरलं! चौथीतील मुलीवर दोघांकडून अत्याचार, कुटुंब शेतात जाताच नराधमांनी साधला डाव

Rape on Minor Girl in Nashik: नाशकात दोन तरुणांनी एका चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीसोबत अत्याचाराचा (2 men raped 4th grade school girl) कळस गाठला आहे.

Rape on Minor Girl in Nashik: नाशकात दोन तरुणांनी एका चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीसोबत अत्याचाराचा (2 men raped 4th grade school girl) कळस गाठला आहे.

Rape on Minor Girl in Nashik: नाशकात दोन तरुणांनी एका चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीसोबत अत्याचाराचा (2 men raped 4th grade school girl) कळस गाठला आहे.

नाशिक, 29 सप्टेंबर: काल नाशिक शहरातील पवननगर परिसरात एका विधवा महिलेवर बलात्कार (Rape on widow) करण्यात आला होता. नराधमाने पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत पीडितेसोबत अत्याचार केले होते. याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली आहे. ही खळबळजनक घटना ताजी असताना, नाशकात महिला अत्याचाराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी एका चौथीत शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीसोबत अत्याचाराचा (2 men raped 4th grade school girl) कळस गाठला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR  lodged) करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या (Both arrested) आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित घटना नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील औंढेवाडी येथील आहे. तर 9 वर्षीय पीडित मुलगी इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असून तिचे आई-वडील शेतीची कामं करतात. सध्या शेतीची कामं सुरू असल्याने पीडित मुलीचे आई वडील पीडित मुलीला घरात ठेवून शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान संशयित आरोपी गणेश ऊर्फ शंकर निवृत्ती कुंदे (वय-43) याने पीडितेवर अत्याचार केला आहे. आरोपीने पीडितवर राहत्या घरात आणि शेतात नेऊन अत्याचार केला आहे. तसेच घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबीयांना जीवे मारेल, अशी धमकीही दिली होती.

हेही वाचा-दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; भयावह अवस्थेत आढळली चिमुकली

यानंतर दुसऱ्या एका 16 वर्षीय आरोपीनं पीडित मुलीवर तब्बल तीन वेळा अत्याचार केला आहे. पीडित मुलीचे आईवडील शेतात कामासाठी गेले की आरोपी पीडितेवर अत्याचार करायचे. पण दरम्यान पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पीडितेनं या घटनेची माहिती आपल्या आई वडिलांना दिली आहे.

हेही वाचा-28वर्षीय तरुणीवर 4जिल्ह्यात विविध ठिकाणी बलात्कार; हातपाय बांधून दिल्या नरकयातना

याप्रकरणी पीडितच्या आई वडिलांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दोन्ही नराधम आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. गणेश ऊर्फ शंकर निवृत्ती कुंदे असं अटक केलेल्या 43 वर्षीय नराधमाचं नाव आहे. तर अन्य एक आरोपी अल्पवयीन आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Nashik, Rape on minor