मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ केला शूट, मुलीच्या भावाला कळताच केला खेळ खल्लास

अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ केला शूट, मुलीच्या भावाला कळताच केला खेळ खल्लास

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Nagpur Crime news: नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध बनवून ब्लॅकमेल करणाऱ्याची हत्या करण्यात आली आहे.

नागपूर, 26 ऑक्टोबर : नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बळजबरी अनैतिक संबंध ठेवत तिच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल (blackmailed) करण्यात आले. या प्रकरणाची पीडित मुलीच्या भावाला माहिती मिळताच त्याने आरोपी तरुणाचा काटा काढला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली (two accused arrested) आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अय्याज सिद्दीकी याने पीडित मुलीचा लपून आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत तो अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होता. वारंवार ब्लॅकमेल करुन आरोपी अय्याज याने पीडित मुलंसोबत लैंगिक संबंध ठेवले.

या संपूर्ण प्रकाराची माहिती पीडित मुलीच्या भावाला मिळाली. त्यानंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीच्या भावाने आपल्या मित्राच्या मदतीने आरोपी अय्याज सिद्दीकी याचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानुसार दोघांनी मिळून अय्याज सिद्दीकी याच्यावर चाकूने वार करत हत्या केली. त्यानंतर अय्याज सिद्दीकीयाचा मृतदेह एका कपड्यात गुंजाळून झुडपात फेकला.

रविवारी (24 ऑक्टोबर 2021) पोलिसांना झुडपात मृतदेह आढळला. या प्रकरणचा पोलिसांनी तपास सुरू केला असता. आरोपींच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्तीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. अय्याज सिद्दीकीची हत्या चाकूने केली होती. या हत्येनंतर दोघांनीही चाकू तलावात फेकला होता. तसेच अय्याज सिद्दीकी याचा फोनही फोडून टाकला होता.

नागपुरात Porn Video पाहून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

एका 14 वर्षीय मुलाने चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील कामठी (Kamathi) परिसरात काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. या मुलाने पॉर्न व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नागपुरात (Nagpur) एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामठी येथे ही घटना घडली आहे. आरोपी मुलगा हा 14 वर्षीय असून तो नववीत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हा मुलगा आणि त्याती बही दोघेच घरात होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या 4 वर्षीय मुलीला त्याची बहीण घेऊन आली. यानंतर आरोपी मुलाने आपल्या बहिणीला फिशपॉट दुरुस्ती करण्यासाठी पाठवले.

बहीण घरातून बाहेर पडताच आरोपी मुलाने या चिमुकलीला आपल्या बेडरूममध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने तिला घरी सोडलं. यावेळी मुलगी रडत होती. तिच्या आईने याबाबत विचारले असता आरोपी असलेल्या 14 वर्षीय मुलाने सांगितले की, ती बेडवरुन खाली पडली आणि दुखापत झाली. मग, पीडित मुलीच्या आईने तपासणी केली असता तिच्या गुप्तांगाला दुखापत झाली असून रक्त येत असल्याचं निदर्शनास आले.

First published:

Tags: Crime, Nagpur