एका शब्दावरुन पेटला वाद; नागपुरात तरुणाने चाकूने भोकसून जीवलग मित्राला संपवलं

एका शब्दावरुन पेटला वाद; नागपुरात तरुणाने चाकूने भोकसून जीवलग मित्राला संपवलं

Murder in Nagpur: दारू पित असताना किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर एका तरुणाने आपल्या मित्राची धारदार शस्त्राने भोकसून हत्या (Friend Murder) केली आहे.

  • Share this:

नागपूर, 23 सप्टेंबर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात गेल्या काही दिवसांपासून हत्येचं सत्र सुरू आहे. कालच एका तरुणाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना, अवघ्या 48 तासांच्या आत नागपुरात आणखी एक हत्येची घटना उघडकीस आली आहे. दारू पित असताना किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर एका तरुणाने आपल्या मित्राची धारदार शस्त्राने (Murder in sharpen weapon) भोकसून हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला अटक (Accused friend arrest) केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

संबंधित घटना नागपुरातील व्यंकटेशनगर येथे घडली आहे. तुषार बैस असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आकाश गौड असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मृत तुषार हा आरोपी आकाश आणि अन्य एक मित्र राम याच्यासोबत आपल्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर दारू पिण्यासाठी गेला होता. दरम्यान, दारू पित असताना, आवडतं गाणं लावण्यावरून आरोपी आकाश आणि रामचा किरकोळ वाद झाला.

हेही वाचा-मुंबई पुन्हा हादरली! डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार

तिघंही दारूच्या नशेत असल्याने हा वाद वाढत गेला. त्यानंतर आरोपीने राम याला बैलबुद्धी असल्याचं म्हटलं. या एका शब्दामुळे आणखी वाद वाढत गेला. राम हा सुशिक्षित असून एका चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे. 'मला बैलबुद्धी म्हणण्याची तुझी लायकी नाही' असं प्रत्युत्तर रामने दिलं. यातून हा वाद आणखी वाढत गेला. यावेळी मृत तुषार देखील याच ठिकाणी होता. या वादात तोही मध्ये पडला.

हेही वाचा-झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून झाडल्या गोळ्या; धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं!

पण थोड्याच वेळात यांचा वाद शांत झाला आणि सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. पण रात्री उशीरा मृत तुषार पुन्हा भांडण करण्याच्या उद्देशाने आरोपीच्या घरी गेला. तेव्हा संतापलेल्या आरोपी आकाशने घरातून चाकू आणत तुषारच्या छातीत खूपसला. तुषार जखमी झालेलं पाहून आरोपी आकाशने त्याला त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण आज सकाळी तुषारचा मृत्यू झाला आहे. मित्राचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी आकाशने घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या  काही तासांत आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: September 23, 2021, 3:39 PM IST

ताज्या बातम्या