Home /News /nagpur /

दारूच्या नशेत मित्राला हिनवलं अन्..; नागपुरात दिवसाढवळ्या घडला हत्येचा थरार

दारूच्या नशेत मित्राला हिनवलं अन्..; नागपुरात दिवसाढवळ्या घडला हत्येचा थरार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Nagpur: नागपुरातील गोपालनगर परिसरात एका तरुणानं आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं दारुच्या नशेत आपल्या मित्राच्या गळ्यावर वार करून त्याचं डोकं दगडानं ठेचलं.

    नागपूर, 16 मार्च: नागपुरातील (Nagpur) गोपालनगर परिसरात एका तरुणानं आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं दारुच्या नशेत आपल्या मित्राच्या गळ्यावर वार (Attack with knife) करून त्याचं डोकं दगडानं ठेचलं (Crushed head with stone). जीवलग मित्राला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर नराधम आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी (Injured) तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. विक्रांत बंडगर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर गणेश बडेवार असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मृत विक्रांत आणि आरोपी गणेश बडेवार दोघं एकमेकांचे जीवलग मित्र असून ते नागपुरातील जयप्रकाशनगरातील रहिवासी आहेत. दोघंही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याविरोधात हल्ला, चोरी आणि विनयभंग यासारखे गुन्हे दाखल आहेत. हेही वाचा-विवाहितेच्या आत्महत्येनंतर BF चा खून; जिथे अंत्यसंस्कार केले तिथेच आढळला मृतदेह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मंगळवारी दुपारी मृत विक्रांत आणि आरोपी गणेश दोघंही गोपालनगर परिसरात दारू प्यायला बसले होते. यावेळी मृत विक्रांत यानं गणेशला 'तेरे भांजे का मर्डर हो गया, तुने कुछ किया,' म्हणून हिनवले. याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला. दोघंही दारुच्या नशेत असल्याने हा वाद वाढतच गेला. यावेळी संतापलेल्या गणेशनं रागाच्या भरात विक्रांतच्या गळ्यावर चाकुने हल्ला केला. हेही वाचा-एक घाव अन् घरभर पडला रक्ताचा सडा, नगरमध्ये पतीने पत्नीचा केला थरारक शेवट आरोपी गणेश एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं विक्रांतच्या डोक्यात भलामोठा दगड घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. जीवलग मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी गणेश यानं घटनास्थळावरून धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर आरोपी गणेशचा शोध घेतला. यावेळी तो दारुच्या नशेत आढळला. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता, क्षुल्लक कारणातून हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Nagpur

    पुढील बातम्या