Home /News /nagpur /

...तर वडिलांच्या विरोधातही आंदोलन करणार, नितीन राऊ तांच्या मुलानेच दिला इशारा

...तर वडिलांच्या विरोधातही आंदोलन करणार, नितीन राऊ तांच्या मुलानेच दिला इशारा

 बेरोजगारीची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आलंय

बेरोजगारीची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आलंय

बेरोजगारीची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आलंय

नागपूर, 15 एप्रिल : तरुणांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) विरोधात तसंच प्रसंगी आपले वडील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधातही आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ( Nitin Rauts son Kunal Raut) यांनी दिला आहे.  घरातूनच मुलाने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या वतीनं 'यंग इंडिया के बोल' या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेची माहिती त्यांनी दिली. 'देशात आणि राज्यात तरुणांच्या बऱ्याच समस्या आज आहे. विशेषतः बेरोजगारीची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यात केंद्र आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आलंय. त्यामुळे राज्यातील आपल्याच सरकारच्या आणि ऊर्जामंत्री असलेले आपले वडील नितीन राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा कुणाल राऊत यांनी दिला. (रशियन सैनिकांकडून युक्रेनी महिलांवर सैतानी अत्याचार, वाचून होईल थरकाप) दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील लोडशेडिंगबद्दल माहिती दिली. कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते त्यांच्या व्यवस्थापनामुळे समस्या निर्माण झाली आहे. कोळशाचं प्रमाण, त्याची जी परिस्थिती असते त्यानुसार किती  प्रमाण असते त्यानुसार दररोज कोळसा दिला जातो. या स्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाची परिस्थिती आहे जर देशाची परिस्थिती नाही तर केंद्र मंत्र्यांनी सर्व राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांसोबत चर्चा का केली, अशी माहिती राऊत यांनी दिली. तुम्हाला कोळसा खरेदी करायचा असेल तर इम्पोटेड कोळसा खरेदी करावा, असं सांगितलं. याचा अर्थ देशांमध्ये आणि राज्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. कोरोनानंतर विजेची मागणी वाढली आहे, मात्र राज्य सरकारने पूर्णपणे व्यवस्थापन केले आहे, अधिकारी आमचे रोज नजर ठेवून आहेत, बैठका घेत आहेत. ही वेळ या देशात दुसऱ्यांदा आलेला आहे, राज्य सरकारची या अजिबात चूक नाही, आम्हाला आता कोळसा वापरून पावसासाठी सुद्धा साठा करून ठेवायचा आहे, असं सुद्धा राऊत यांनी ठणकावून सांगितलं. ('निकालातील टक्क्यांपेक्षा सहवेदनेची जाणीव प्रगल्भ करणारी', बोलका Photo) राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही, आम्ही काम करतो आहे. मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावा. मात्र दोन वर्षांत अडीच वर्षात आम्ही आजही व्यवस्थित पुरवठा करू शकलो, मात्र केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महाडिस्को मला कर्ज देऊ नका पत्र दिले आहे. ग्रामविकास खात्याने 8 हजार कोटी रुपये दिले नाही, त्यामुळे आमची थोडी कुचंबणा झाली आहे, असंही राऊत म्हणाले. त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र, तक्रार दिली आहे, जर आम्हाला हे पैसे मिळाले तर वीज घ्यायला शक्य होईल आणि 19 तारखेपर्यंत मी नियोजन केलेलं आहे सर्व परिस्थिती सुरळीत होईल,  सर्व पर्यायांवर आम्ही लढतो आहे, बँका आम्हाला कर्ज द्यायला तयार नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असंही राऊत यांनी सांगितलं. (श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटर बसला उपोषणाला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?) दानवेंनी आरोप करण्यापेक्षा   चार बोट आपल्याकडे आहे, हे विसरू नये. आरोप करणे खूप सोपे आहे, मात्र राज्य आमचं असेल तर  विरोधकांचाही आहे, त्यामुळे सकारात्मक विचार करावा आणि यामध्ये चर्चा करून विचारविनिमय करून हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करावा. दानवे साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करावं, त्यांच्याकडे  रेल्वे खाते आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला तपासून घ्यावे, असा टोला राऊत यांनी दानवेंना लगावला. 'जे वीजचोर्‍या करतात, वीज बिल भरत नाही, त्यांचं काय करायचं, फुकटात मिळत नाही, पैसा लागतो, माझं राज्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी वीज त्यांनी वीज बिल प्रामाणिकपणे भरावे, त्यांचे उपकार सरकार विसरणार नाही, सरकारी निमसरकारी खात्यात जे नियम जे निकष राज्यातील जनतेला आहे, तेच नियम तेच निकष सर्व खात्यांना लागू आहे, असंही राऊत म्हणाले.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या