निगरगट्ट शासन कधी ऐकणार? रस्ते बांधकामासाठी गावकऱ्यांचे चिखलात लोटांगण

निगरगट्ट शासन कधी ऐकणार? रस्ते बांधकामासाठी गावकऱ्यांचे चिखलात लोटांगण

पर्यटन स्थळ म्हणून हजारो नागरिक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.

  • Share this:

अमरावती, 24 जून : अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी हे संत गाडगेबाबा यांचं अंतिम स्थान. याच नागरवाडीमध्ये संत गाडगेबाबा यांनी आपला अंतिम श्वास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.  नागरवाडीचा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन यादीत सुद्धा समावेश आहे. पर्यटन स्थळ म्हणून हजारो नागरिक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. वनी बेलखेड ते नागरवडी हा तीन किलोमीटरचा रस्ता. मात्र या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचलेला असतो. या रस्त्यावर अनेकदा दुचाकी वाहने किंवा पायी चालणारे घसरून पडावे अशी परिस्थिती असते. हा तीन किलोमीटरचा रस्ता अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम करावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणात या रस्त्याचं बांधकाम रखडले आहे. त्यामुळे आज वनी बेलखेडा येथील नागरिकांनी वनी बेलखेडा मार्गावर साचलेल्या चिखलात लोटांगण आंदोलन केले. नागरवाडी येथे संत शाळा आणि कॉलेज सुद्धा आहे. या नागरवाडीला जाण्यासाठी वनी बेलखेडा येथूनच जावे लागते. गेल्या तीन वर्षांपासून विनंती केली, अनेकदा निवेदनं दिले तरीही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मात्र या रस्त्याचा बांधकाम केलेले नाही.

हे ही वाचा-नागपुरात दुपारी 12 वा. काय घडलं? हसतं-खेळतं माटूळकर कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त

आज वनी बेलखेडा येथील मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करत आंदोलन केले. विशेष म्हणजे हे गाव अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यात जिल्हा परिषदेच्या मतदार संघात सुद्धा येत आहे. हे गावकरी रस्त्यावर चिखलात लोटांगण आंदोलन करत असल्याची माहिती मिळताच ब्रह्मनवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

जिल्हा परिषद हा रस्ता बांधण्यास तयार नसेल तर त्यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा अशी देखील वनी बेलखेडा येथील नागरिकांनी मागणी केलेली आहे. प्रत्येक वेळी या गावकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने आश्‍वासन दिले मात्र रस्त्याचे बांधकाम न केल्याने आज या नागरिकांनी चिखलात लोटांगण आंदोलन केले व आता जिल्हा परिषदेने हा प्रश्न मार्गी न लावल्यास संपूर्ण चिखल सार्वजनिक बांधकाम विभागात नेऊन टाकणार अशी इशारा सुद्धा वनी बेलखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच मंगेश देशमुख यांनी दिला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: June 24, 2021, 7:17 PM IST
Tags: amravati

ताज्या बातम्या