मराठी बातम्या /बातम्या /nagpur /VIDEO : '...आणि नो बॉलवर माझी विकेट पडली'; संजय राठोडांनी त्या कटू प्रसंगाची काढली आठवण

VIDEO : '...आणि नो बॉलवर माझी विकेट पडली'; संजय राठोडांनी त्या कटू प्रसंगाची काढली आठवण

एका कार्यक्रमादरम्यान माजी वनमंत्री संजय राठोड बोलत होते. या घटनेचा VIDEO समोर आला आहे.

एका कार्यक्रमादरम्यान माजी वनमंत्री संजय राठोड बोलत होते. या घटनेचा VIDEO समोर आला आहे.

एका कार्यक्रमादरम्यान माजी वनमंत्री संजय राठोड बोलत होते. या घटनेचा VIDEO समोर आला आहे.

यवतमाळ, 16 सप्टेंबर : राज्यभरात चर्चिला गेलेल्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या मृत्यू नंतर वादात अडकलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड (Shiv Sena Leader) यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूनंतर अनेक ऑडिओ क्लिप समोर आल्या होत्या. यामध्ये संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा केला जात होता. दरम्यान विरोधी पक्षानेही हा विषय लावून धरला होता. त्यामुळे शेवटी संजय राठोड (Former Forest Minister Sanjay Rathod) यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान ते कमबॅकचा प्लान करीत असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. आज यवतमाळ येथे एका वर्तमानपत्राच्या लोकार्पण सोहळ्याला संजय राठोड हजर होते. यावेळी लोकांशी संवाद साधताना त्यांनी त्या कटू अनुभवाचा उल्लेख केला. पूजा चव्हाण प्रकरण माध्यमांनीही लावून धरलं होतं. वारंवार येणाऱ्या नवनव्या ऑडिओ क्लिप आणि फोटोंमुळे संजय राठोड यांच्या भोवती संशयाचं वलय निर्माण झालं होतं. त्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ माध्यमांनीही या विषयातील प्रत्येक हालचालीची अपडेट दिली होती. त्याची आठवण काढत माजी वनमंत्री संजय राठोड म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझी नो बॉलवर विकेट गेली होती. त्यामुळे माध्यमांची ताकद काय असते हे सर्वांना माहीत आहे. आजही वृत्तपत्रातील बातमीवर लोकांना विश्वास वाटतो, असं ते पुढे म्हणाले. लोकसूत्र वर्तमानपत्राच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते.

हे ही वाचा-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना पोलिसांची क्लीन चिट?

आणखी एक तक्रार..

गेल्याच महिन्यात शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका महिलेने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली होती. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही, तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत माझा लैंगिक छळ करतात असं ही त्यात म्हटलं आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यासंदर्भात एक पोस्ट केली होती.

First published:
top videos

    Tags: Sanjay rathod, Shivsena, Yavatmal