आता हे काय नवीन! नागपुरात आढळल्या 'पॅराबॉम्बे' रक्तगटाच्या दोन व्यक्ती, जाणून घ्या प्रकरण

आता हे काय नवीन! नागपुरात आढळल्या 'पॅराबॉम्बे' रक्तगटाच्या दोन व्यक्ती, जाणून घ्या प्रकरण

नागपुरात 'पॅराबॉम्बे' रक्तगट असणाऱ्या दोन व्यक्ती आढळल्या (2 people found Para bombay blood group) आहेत.

  • Share this:

नागपूर, 24 सप्टेंबर: नागपुरात 'पॅराबॉम्बे' रक्तगट असणाऱ्या दोन व्यक्ती आढळल्या (2 people found Para bombay blood group) आहेत. पॅराबॉम्बे हा एक दुर्मीळ रक्तगट असून खूपच कमी लोकांमध्ये अशा प्रकारचा रक्तगट असतो. मागील बऱ्याच वर्षांपासून हा रक्तगट असणाऱ्या व्यक्ती आढळल्या नाहीत. पण नागपुरात या रक्तगटाची ही पहिलीच केस असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आढळून आलेल्या दोन्ही व्यक्ती 'पॅराबॉम्बे ओ पॉझिटिव्ह' या अति दुर्मिळातील दुर्मीळ रक्तगटाच्या आहेत.

नागपुरात डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने अलीकडेच एका रक्तदान शिबीराचं आयोजन केलं होतं. दरम्यान एका मुलाचा रक्तगट तपासला असता, हा रक्तगट 'पॅराबॉम्बे' रक्तगट असल्याचं चाचणीत निष्पन्न झालं. पण एरवी अशाप्रकारचं रक्त आढळत नसल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील धक्का बसला.

हेही वाचा-कोरोना लशीच्या बुस्टर डोसला परवानगी; फक्त या लोकांना मिळणार Booster dose

पण संबंधित रक्तगट पॅराबॉम्बे असण्यावर शिकामोर्तब करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मुलासह त्याच्या वडिलांचे रक्ताचे आणि लाळीचे नमुने मुंबईतील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी'कडे पाठवले. दरम्यान याठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने चाचणी केली असता, संबंधित नमुने 'पॅराबॉम्बे' रक्तगटाचे असल्याचं चाचणीत निष्पन्न झालं आहे.

हेही वाचा-आता चीनजवळच्या लाओस देशात वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्यानं खळबळ

याबाबत अधिक माहिती देताना, डॉ. सोनी यांनी सांगितलं की, मानवी शरीरात रक्ताची निर्मिती होण्यासाठी 'एच अँटीजन'ची आवश्यकता असते. पण जनुकीय रचनेत काही कारणामुळे बदल झाल्यास 'एच अँटीजन' तयार न होता,त्याविरोधातील अँटीबॉडीज तयार होता. अशावेळी शरीरात 'पॅराबॉम्बे' सारखा रक्तगट तयार होतो.

Published by: News18 Desk
First published: September 24, 2021, 3:43 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या