शेजाऱ्यांनी पाहिली नको ती गोष्ट; ...म्हणून 2 मुलींनी केलं घरातून पलायन

शेजाऱ्यांनी पाहिली नको ती गोष्ट; ...म्हणून 2 मुलींनी केलं घरातून पलायन

आई-वडील रागावतील या कारणातून दोन अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याची एक खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे.

  • Share this:

नागपूर, 24 सप्टेंबर: आई-वडील रागावतील या कारणातून दोन अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याची एक खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. संबंधित मुलींनी आपल्या मित्राला घरी बोलवलं होतं. मुलगा घरी आल्याचं काही शेजाऱ्यांनी पाहिलं. संबंधित शेजारी मुलगा घरी आल्याची माहिती आपल्या आई वडिलांना सांगतील. यामुळे आई-वडिल रागावतील या भीतीतून नागपुरातील दोन अल्पवयीन मुलींनी आपल्या घरातून पलायन केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबंधित दोन्ही मुलींचा शोध घेतला जात आहे.

स्मृती अनिल काटोले (वय-13) आणि मृणाली अनिल काटोले (वय-16) असं घरातून पलायन केलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींची नावं आहेत. संबंधित मुलींचे वडील सराफा व्यावसायिक असून त्याचं रामेश्वरी येथे ज्वेलर्सचं दुकान आहे. संबंधित मुलींनी बुधवारी सायंकाळी आपल्या मित्रांना घरी बोलवलं होतं. मित्रांना घरी बोलवल्याचं शेजाऱ्यांनी पाहिलं होतं. मित्राला घरी बोलवल्याची माहिती शेजारी आई वडिलांना सांगतील, त्यामुळे आई- वडील रागावतील या भीतीने दोन्ही मुली घाबरून गेल्या होत्या.

हेही वाचा-अत्याचारातून गरोदर राहिलेल्या मुलीची घरीच प्रसूती; 13 जणांवर गुन्हा दाखल

त्यामुळे आई- वडील दुकानात असताना, दोन्ही मुली रात्री घरातून पळून गेल्या आहेत. दोन्ही मुली घरातून गायब असल्याचं लक्षात येताच, त्यांचे वडील सुनिल काटोले यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी मोबाइल कॉल डिटेल्स तपासले असता, दोघींनी रात्री साडे अकराच्या सुमारास एका मित्राला फोन केला. पण त्यानंतर तो फोन लगेच स्वीच ऑफ झाला. त्यामुळे संबंधित मुली नेमक्या कुठे गेल्या हे पोलिसांना कळू शकलं नाही.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण; आरोपीने पोलीस ठाण्यातच दिला जीव

पण पोलिसांनी तपास करत, ज्या मित्राला फोन केला होता त्याचा शोध घेतला. पहाटे तीनच्या सुमारास मित्र सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, दोन्ही मुली नाशिकला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे पोलीस आणि नाशिक पोलिसांना सतर्क केलं आहे. पण संबंधित मुली सध्या नेमक्या कुठे आहेत. याची कोणतीही माहिती पोलिसांकडे नाही. पोलीस बेपत्ता मुलींचा शोध घेत आहेत.

Published by: News18 Desk
First published: September 24, 2021, 2:59 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या