Home /News /nagpur /

देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी

Two devotees died in accident: देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोन वेगवेगळ्या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर, 12 ऑक्टोबर : नवरात्रौत्सवात (Navratri) देव दर्शनाला गेलेल्या दोघांचा अपघातात (accident) मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांत या दोन्ही भाविकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर (Nagpur) येथे एक घटना घडली आहे तर दुसरी घटना नांदेड (Nanded) येथे घडली आहे. नागपुरातील कोंढाळी येथील चार तरुण नागपूर येथुन अमरावती येथे अंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. अमरावती येथून नागपूरला परत येत असतांना त्यांची कार सातनवरी शिवारात नादुरुस्त झाली नादुरुस्त कारला मागुन धक्का मारत असतांना या तरूणांना मागुन अज्ञात ट्रकने धडक दिली. या अपघातात एक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाला किरकोळ मार लागला आहे. आकाश अडसुले असे मृतकांचे नांव आहे. रविवारी चार मित्र नागपूर येथुन कार घेऊन अमरावतीला अंबादेवीच्या दर्शनाला गेले होते. परत असतांना ही घटना घडली. या अपघातात सुमीत नागदेवे, अश्विन वाकोळीकर, आकाश जगन्नाथ वाकोळीकर हे जखमी झाले. कोंढाळी पोलीसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद अपघातांचा गुन्हा नोंदवीला आहे. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नांदेड येथे महिला बाइकरचा मृत्यू सातारा येथील हिरकणी बाईक रायडर्स महिला ग्रुपमधील एका महिलेचा नांदेडमध्ये अपघातात मृत्यू झाला आहे. शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी साताऱ्याहुन नऊ महिला बाईकवर निघाल्या होत्या. विविध ठिकाणच्या देवींचे दर्शन घेत या महिला माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात होत्या. हा ग्रुप नांदेडमधील अर्धापुर येथे पोहचला असता अपघात झाला. अर्धापूर येथे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. एका खड्यातून बाईक नेताना शुभांगी पवार ह्या घसरून पडल्या. तितक्यात पाठून येणाऱ्या टँकरने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित आठ महिला सुखरूप आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मृतदेह आणि महिलांना साताऱ्याला पाठवायची व्यवस्था केली आहे. या ग्रुप मधील महिला विविध विभागात अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. चिमुकल्या लेकींसमोर आईनं तळतळत सोडला प्राण रविवारी नांदगाव येथे भीषण अपघात झाला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असला तरी, सध्या देशात अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. त्यामुळे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी ये-जा करत आहेत. अशातच रविवारी पहाटे देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका महिलेवर काळाने घाला घातला आहे. भल्या पहाटे आपल्या तीन चिमुकल्या लेकींना घेऊन मैत्रिणींसोबत देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तीन चिमुकल्या लेकींसमोरचं आईनं तळतळत प्राण सोडला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला पहाटे साडेपाच वाजता आपल्या तीन चिमुकल्या लेकी आणि मैत्रिणीसोबत नवरात्रोत्सामुळे देवीच्या दर्शनासाठी चालली होती. दरम्यान रेल्वे रुळ ओलांडत असताना, दोन रेल्वे एकाच वेळी पास झाल्या. त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे. स्वाती रविंद्र शिंदे असं मृत महिलेचं नाव आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या आईच्या आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Nagpur, Nanded

पुढील बातम्या