Home /News /nagpur /

नागपूर हादरलं, सलग दुसऱ्या दिवशीही तरुणाची निर्घृणपणे हत्या

नागपूर हादरलं, सलग दुसऱ्या दिवशीही तरुणाची निर्घृणपणे हत्या

 धक्कादायक म्हणजे, शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका तरुणाची हत्या झाली होती.

धक्कादायक म्हणजे, शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका तरुणाची हत्या झाली होती.

धक्कादायक म्हणजे, शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका तरुणाची हत्या झाली होती.

नागपूर, 12 सप्टेंबर : नागपूरमध्ये (nagpur) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दोन दिवसांमध्ये दोन हत्याच्या (murder) घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज रात्री पुन्हा एकदा एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरा पोलीस (Yashodhara Police station) ठाण्याच्या हद्दीत आवेश पठाण या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी आवेश पठाणवर धार शस्त्रांनी भीषण हल्ला चढवला. पाठीवर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी आवेश पठाणचा गळा चिरला. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे आवेश पठाणचा जागेवरच मृत्यू झाला. अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार; अखेर 6 महिन्यांनी नराधमाला झाली अटक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. धक्कादायक म्हणजे, शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवार रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली. कालच्या घटनेत तीन आरोपी असून ते फरार आहे.  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. ऑफिसमध्ये काम करताना अचानक खिशात OnePlus Nord 2 चा झाला स्फोट, कंपनी म्हणते तर नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन जणांनी एका मित्राची ११ सप्टेंबर रोजी निर्घृण हत्या केली होती. यानंतर आरोपींनी मित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून भूमिगत विद्युत वाहिनीच्या खड्ड्यात पुरले होते. ही घटना पाच दिवसांनी उघडकीस आली. ज्ञाना रुपराव शेंडे असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव तो उमरेड रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे झोपडपट्टीत राहतो. तर विजय ऊर्फ गोलू सुखराम मांडले आणि सुरजित ऊर्फ सुरज सुखराम मांडले अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावं आहे. संबंधित आरोपी आणि मृत ज्ञाना तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. तिघंही एकत्रित समूहानं भंगार गोळा करायला जायचे. यातून मिळणारे पैसे तिघेही समान वाटून घ्यायचे. दरम्यान याच पैसे वाटपावरून मृत ज्ञाना आणि आरोपी विजय यांच्यात वाद झाला. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून आरोपी विजयनं मित्र सुरजसोबत संगनमत करत ज्ञानाचा खून केला होता. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या