Akola:शिक्षक करतोय सिलेंडर डिलिव्हरी, आर्थिक संकट नाही तर वेगळंच आहे कारण

Akola:शिक्षक करतोय सिलेंडर डिलिव्हरी, आर्थिक संकट नाही तर वेगळंच आहे कारण

Akola Teacher Story : संघदास यांनी मजुरांच्या वस्तीत राहिल्यानं त्यांचे हाल जवळून अनुभवले आहेत. म्हणून मजुरी करून किती पैसा मिळतो हे सर्वांना कळावं म्हणून ते हे काम करत आहेत.

  • Share this:

अकोला, 31 मे : कोरोनाच्या (Coronavirus) या संकटकाळामद्ये अनेकांवर वाईट वेळ आली आहे. कुणी आर्थिक कचाट्यात सापडलंय कुणी आणखी वेगळ्या संकटात. अनेक लोकांना आपली नेहमीती कामं सोडून भलतीच कामही करावी लागत आहेत. अकोल्यातही एक शिक्षक सध्या सिलिंडर घरोघरी पोहोचवत आहेत. पण यामागचं कारण हे आर्थिक संकट किंवा तसं वाईट नसून अत्यंत चांगल्या हेतूनं ते हे काम करत आहेत.

(वाचा-कोव्हिशिल्डचा फक्त एकच डोस दिला जाणार? लवकर लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता)

संघदास वानखडे हे अकोला जिल्ह्यातल्या खडका येथील जिल्हा परिषद शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ते सिलिंडर घरोघरी पोहचवण्याचं काम करत आहेत. यातून जी मजुरी मिळेल ती मजुरांसाठी ऐन संकटकाळात देवदुतासारख्या धावून येणाऱ्या सोनू सूद याच्या हवाली ते करणा आहेत. मजुरांना कामाच्या तुलनेत अत्यंत कमी मोबदला मिळतो. त्यात पोट भरणं कठीण असताना, मुलांचं शिक्षण आणि इतर गोष्टी दूरच राहिल्या. संघदास यांनी मजुरांच्या वस्तीत राहिल्यानं त्यांचे हाल जवळून अनुभवले आहेत. म्हणून मजुरी करून किती पैसा मिळतो हे सर्वांना कळावं म्हणून ते हे काम करत आहेत.

(वाचा-PUNE : मी फक्त अभिनेते मोहन जोशींना ओळखतो, काँग्रेस नेत्यावर महापौरांची कोटी!)

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजू तायडे या त्यांच्या मित्राच्या सिलेंडरच्या गाडीवर ते काम करतायत. कधी कधी चार पाच मजली अपार्टमेंटमध्ये त्यांना सिलिंडर पोहोचवावे लागते. दररोज तीस-पंचवीस सिलेंडर पोहोचवावे लागतात. मजुरांना अनेकदा कामच नसतं. अशी वेळ आपल्यावर आल्यावर काय? मी एवढा शिकलेला मजुरी कशी करू अशा विचाराने कदाचित आपल्याला नैराश्य येईल म्हणून झेपेल ते काम करून संकटाचे दिवस काढायचे यासाठी त्यांनी मेहनतीचं काम करण्याचा निर्णय घेतला.

संघदास वानखडे यांना यातून मिळालेली कमाई सोनू सूद यांना द्यायची आहे. सोनू सूद यांनी मजुरांना प्रचंड मदत केली आहे. त्यांच्यासाठी ते देवदूत बनले. अशा लोकांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे. तसंच लोकांनी मजुरांना सहकार्य करावे हा संदेश देण्यासाठी ते हे काम करत असल्याचं सांगतात. या शिक्षकाने मजुरांना मदत करता यावी यासाठी अनोखं पाऊल उचलल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 31, 2021, 9:42 PM IST

ताज्या बातम्या