Home /News /nagpur /

VIDEO: नितीन गडकरींच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचं अनोखं आंदोलन, रस्त्यावरच भरवली शाळा

VIDEO: नितीन गडकरींच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचं अनोखं आंदोलन, रस्त्यावरच भरवली शाळा

गडकरी यांचं नागपूर (Nagpur) येथील निवासस्थानी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आश्रमशाळेची जागा महामार्गात गेल्यामुळे गडकरींच्या घरासमोरच रस्त्यावरच शाळा भरवत विद्यार्थ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं आहे.

नागपूर, 03 जानेवारी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या घरासमोर फासेपारधी समाजातील विद्यार्थी आंदोलनास बसले आहेत. गडकरी यांचं नागपूर (Nagpur) येथील निवासस्थानी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आश्रमशाळेची जागा महामार्गात गेल्यामुळे गडकरींच्या घरासमोरच रस्त्यावरच शाळा भरवत विद्यार्थ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ येथील हे विद्यार्थी असून आज सकाळी ते गडकरी यांच्या घरासमोर दाखल झाले. फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रम शाळेचे इमारतीची आणि वाचनालयाचे गेलेली जमीन पुन्हा शासनाकडून नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांची आहे. या मागणी मान्य व्हावी म्हणून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी चक्क गडकरींच्या घरासमोरच आंदोलन करत रस्त्यावरच शाळा भरवली. आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि ते गोव्याकडे रवाना झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती आहे..
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Nitin gadkari

पुढील बातम्या