पैशांचा पाऊस पाडण्याच्या लालसेतून वाघाच्या बछड्याची शिकार, नागपुरातील धक्कादायक घटना

पैशांचा पाऊस पाडण्याच्या लालसेतून वाघाच्या बछड्याची शिकार, नागपुरातील धक्कादायक घटना

Tiger Calf killed for money shower in Nagpur: नागपुरात पैशांच्या पावसासाठी अघोरी कृत्य करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

नागपूर, 12 ऑक्टोबर : पैशांचा पाऊस (Money shower) पाडण्याच्या अंधश्रद्धेतून (superstition) वाघाच्या बछड्याची शिकार (Tiger calf killed) करुन अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरात (Nagpur) ही घटना घडली असून याप्रकरणी वन विभागाने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केलं. पैशांचा पाऊसच न पडल्याने आरोपींनी वाघाच्या बछड्याचा मृतदेह विक्री करण्याचा बेत आखला.

आरोपींच्या या बेताची माहिती वन विभागाला मिळाली आणि त्यानंतर सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी खळबळजनक खुलासा केला. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी आपण वाघाच्या बछड्याला प्रथम पकडले आणि त्यानंतर त्याची शिकार करुन अघोरी पूजा केल्याचं आरोपींनी मान्य केलं.

या प्रकऱणी नागपूर वनविभागाने लोमेश आणि कालिदास या आरोपींनी बेड्या ठोकल्या असून अधिक तपास सुरू आहे. तसेच यामागे मोठी टोळी किंवा रॅकेट आहे का याचाही तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मेळघाटात भोंदूबाबाचे 3 वर्षीय बालकावर अघोरी उपचार

काही महिन्यांपूर्वी मेळघाटात एक धक्कादायक प्रकार घडला होता. अशिक्षितपणा व अंधश्रद्धेच्या विळख्यात जखडलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी समाज अनेकदा उपचारांऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत विचित्र उपचार करताना दिसतो. हे लोक निरागस बालकांवर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी डम्मा सारखी अघोरी प्रथा कायम ठेवत असल्याचे दिसून येते. डम्मा म्हणजेच पोटावर लोखंडी सळाखी गरम करुन चटके देणे. अशीच आणखी एक घटना मेळघाटातून समोर आली आहे. यात एका ३ वर्षीय बालकास तांत्रिक, भूमका, ओझाने पोटावर असंख्य चटके (डागण्या) दिले.

या पद्धतीमुळे प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नसून हा चिमुकला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील हा ३ वर्षीय बालक आठवडाभरापासून आजारी होता. कामानिमित्त आई-वडील परतवाडा परिसरात असताना या मुलाला साधारण आजाराने ग्रासले होते, यावेळी त्यांनी धामणगाव येथील खासगी डॉक्टराकडे औषधोपचार केले. मात्र, त्या उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने आणि प्रकृतीत काहीच फरक न पडता वाढल्याने त्यांनी मुलाला थेट भगतबाबाकडे नेले.

या बाबाने उपचार म्हणून अघोरी प्रथेच्या आधारे कोवळ्या निरागस बालकाच्या पोटावर डम्मा, डागण्या देवून पोटाची अक्षरशः चाळणी केली. या तीन वर्षाच्या बालकाच्या पोटावर विळ्याने 70 पेक्षा अधिक चटके दिले होते.

Published by: Sunil Desale
First published: October 12, 2021, 1:21 PM IST

ताज्या बातम्या