Home /News /nagpur /

Shocking! पॅरासिटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोज; वर्ध्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Shocking! पॅरासिटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोज; वर्ध्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न घेता स्वतःच्या मनानं औषधं घेणं चुकीचं आहे. हे जीवावर बेतू शकतं.

    नरेंद्र मते/ वर्धा, 15 मार्च : पॅरासिटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोजमुळे (Overdose of paracetamol tablets) 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणावर तब्बल 40 दिवस उपचार करण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले नाही. याप्रकरणी वर्धा शहर (Wardha News) पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रजत मेंढे (27) असे मृत तरुणाचे नाव असून तो शिवाजी चौक वर्धा येथील रहिवासी आहे. वर्ध्याच्या एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये तो सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. रजत मेंढे हा 29 जानेवारी रोजी रात्री कर्तव्यावर आला. सकाळी तो तेथेच झोपून होता. 30 जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना फोनवर संपर्क साधत प्रकृती बिघडली असल्याची माहिती दिली. वडिलांनी वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले. सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, 9 मार्च रोजी रजतचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण वर्धा पोलिसांकडे आज वर्ग करण्यात आले. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांत भितीचे वातवरण निर्माण झाले. हे ही वाचा-नागपूर हादरलं! पत्नीसह मुलीची गळा चिरुन हत्या... मग पतीने सुद्धा घेतला गळफास डॉक्टरांचा सल्ला न घेताच गोळ्या घेणे जिवावर बेतले हल्लीच्या धकाधकीच्या काळात थोडाही तब्येतीत बिघाड जाणवला की, डॉक्टरांकडे न जाता घरीच उपचार सुरू केले जातात. कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला न घेता स्वतःच्या मनानं औषधं घेणं चुकीचं आहे. हे माहित असताना असे का घडते, याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. झटपट बरं होण्याचं आणि कामावर जाण्याच्या घाईत मात्र ओव्हरडोजमुळे मृत्यू होऊ शकतोय. हे कदाचित माहित नसावं ! मात्र आता सर्वांनीच अशा पध्दतीने औषध उपचार घेणे सुरू केले. तर जीवावर बेतल्या शिवाय राहणार नाही हे मात्र खरे!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Health, Wardha news

    पुढील बातम्या