नागपूर, 20 ऑक्टोबर : एका 14 वर्षीय मुलाने चार वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील कामठी (Kamathi) परिसरात हा प्रकार घडला आहे. या मुलाने पॉर्न व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नागपुरात (Nagpur) एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामठी येथे ही घटना घडली आहे. आरोपी मुलगा हा 14 वर्षीय असून तो नववीत शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हा मुलगा आणि त्याती बही दोघेच घरात होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या 4 वर्षीय मुलीला त्याची बहीण घेऊन आली. यानंतर आरोपी मुलाने आपल्या बहिणीला फिशपॉट दुरुस्ती करण्यासाठी पाठवले.
बहीण घरातून बाहेर पडताच आरोपी मुलाने या चिमुकलीला आपल्या बेडरूममध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने तिला घरी सोडलं. यावेळी मुलगी रडत होती. तिच्या आईने याबाबत विचारले असता आरोपी असलेल्या 14 वर्षीय मुलाने सांगितले की, ती बेडवरुन खाली पडली आणि दुखापत झाली. मग, पीडित मुलीच्या आईने तपासणी केली असता तिच्या गुप्तांगाला दुखापत झाली असून रक्त येत असल्याचं निदर्शनास आले.
यानंतर पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. आरोपी मुलाने मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहून त्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्स ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच तिच्या आईला मोठा धक्का बसला. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या तक्रारीच्या आधारे कामठी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आरोपी मुलाने पॉर्न व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
बहिणीच्या अनैतिक संबंधातून निरागस भावाची हत्या
नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाचा गावात बोभाटा होऊ नये म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मृत मुलाच्या 17 वर्षीय बहिणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत.
मुलाची गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे बहिणीनेच भावाची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी बहीण आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेत कसून चौकशी केली. यानंतर दोघांच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या आहेत. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणूनच निरागस सुजलची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी 17 वर्षीय मुलीसह तिच्या प्रियकराला रात्री उशिरा अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.