मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू करतोय पेट्रोप पंपावर काम

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू करतोय पेट्रोप पंपावर काम

2006 नंतर त्यांनी पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या कामसह कन्स्ट्रक्शन मजुरीचे काम सुरवात करायला केली. कोविड काळात तर प्रवीण वहालेंवर उपासमारीची वेळ आली होती.

2006 नंतर त्यांनी पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या कामसह कन्स्ट्रक्शन मजुरीचे काम सुरवात करायला केली. कोविड काळात तर प्रवीण वहालेंवर उपासमारीची वेळ आली होती.

2006 नंतर त्यांनी पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या कामसह कन्स्ट्रक्शन मजुरीचे काम सुरवात करायला केली. कोविड काळात तर प्रवीण वहालेंवर उपासमारीची वेळ आली होती.

नागपूर, 22 ऑगस्ट : अमेरिका, चीनसह इतर छोट्या छोट्या देशाच्या तुलनेने भारत ऑलिम्पिकमध्ये मागे का राहतो ? तर त्याचे उत्तर नागपूरच्या प्रवीण वहाले (Pravin Wahale) या खेळाडूच्या उदाहरणावरून मिळते. 16 वर्ष खेळाडू म्हणून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल ज्या प्रवीणला महाराष्ट्र सरकार सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने (Shiv Chhatrapati Award) सन्मानित केले होते. आज त्याच खेळाडूला पोट भरण्यासाठी पेट्रोल पंपावर नोकरी (Job on Petrol Pump) करावी लागत आहे. हे आपल्या क्रीडा घोरणाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. याच कारणामुळे आपण क्रीडा क्षेत्रात खूप खालच्या स्थानी आहोत हे सिद्ध होते. यावरच बघूया न्यूज 18 लोकमतचा विशेष रिपोर्ट

स्वतःच्या वाटेत अनेक अडथडे आले असतांना देखील इतरांच्या गाडीत पेट्रोल भरून देत त्यांचा पुढील प्रवास सुकस करणारे हे आहे क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार विजेता प्रवीण वहाले. नशिबाच्या रेषेने दोष देण्यापेक्षा आपल्या व्यवस्थेने त्यांची ही थट्टा केली असे म्हणायला हरकत नाही. प्रवीण वहाले यांनी 1991 ते 2007 या काळात खो-खो आणि आट्यापाट्या या खेळा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या काळात ज्युनिवर आणि सब ज्युनिअर स्पर्धेत 15 वर मेडल त्यांनी मिळवली. त्यात जास्तीत जास्त गोल्ड मेडल आहे. त्यांच्या या कार्याला बघून 2006 मध्ये तत्कालीन मुखमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला.

भयंकर ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

मात्र शिवछत्रपती अवॉर्ड देऊन राज्य सरकारला प्रवीण वहाले या गुणवंत खेळाडूचा विसर पडला. सरकारी नोकरीचे तर सोडा पण त्यांच्या गुणवत्तेचा वापर करून भविष्यातील खेळाडू तयार करून घेण्यासाठी प्रवीण वहाले यांची साधी आठवण राज्य सरकारला आली नाही. त्यामुळे 2006 नंतर त्यांनी पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या कामसह कन्स्ट्रक्शन मजुरीचे काम सुरवात करायला केली. कोविड काळात तर प्रवीण वहालेंवर उपासमारीची वेळ आली होती. तेव्हा राज्य शासनाने खेळाडूंना मदत देण्याची घोषणा केली. ही मदत मिळावी म्हणून ते क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या नागपूरच्या कार्यालयात गेले असता फक्त आंतराष्ट्रीय खेळाडूंनाच मदत केली जात असल्याचे सांगून हाकलून देण्यात आले. त्यामुळे देशी खेळात भविष्य नसल्याने आता आपला आपल्या मुलांनाही खेळामध्ये वेळ वाया घालवू देणार नसल्याचे प्रवीण यांनी सांगितले. जे सक्षम आहे त्यांनी देशी खेळापेक्षा विदेशी खेळ करिअर म्हणून निवडावे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिली.

कल्याण सिंह यांच्या निधनानंतर अडवाणी भावुक, राम मंदिर आंदोलनाबाबत म्हणाले...

प्रवीण वाहले यांच्या बाबत क्रीडामंत्री सुनील केदार यांना विचारणा केली असता मी माहिती घेऊन नंतर बोलतो असे केदार त्यांनी सांगितले. मात्र प्रवीण वहाले हे आपल्या आपल्या उदासीन व सुस्थ क्रीडा धोरणाचे प्रतीक आहे. त्यामुळे आपण ऑलम्पिक मध्ये मेडलच्या पंगतीत खालच्या स्थानावर का असतो हे वेगळे सांगायची गरज नाही.

First published:

Tags: Nagpur