मराठी बातम्या /बातम्या /nagpur /नागपुरात SEX रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची पोलिसांनी केली सुटका

नागपुरात SEX रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची पोलिसांनी केली सुटका

स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Sex Racket Busted: सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केला आहे.

नागपूर, 24 ऑगस्ट : नागपुरात सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सलूनवर छापा टाकत ही कारवाई केली आहे. यावेळी नागपूर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे तर दोन मुलींची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. (Sex racket bused in Nagpur)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सलूनमधून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मेडिकल चौक परिसरातील या सलूनवर छापा टाकला आणि कारवाई केली आहे.

सासऱ्यानं सुनेसह 5 जणांची केली निर्घृण हत्या; स्वतःच पोलिसांकडे जात सांगितलं धक्कादायक कारण

छापा टाकल्यावर घटनास्थळावरुन नागपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, सलूनवर छापा टाकल्यावर घटनास्थळावरुन आम्ही दोन मुलींची सुटका केली आहे. यापैकी एका मुलीचं वय 27 वर्षे आहे तर एक मुलगी ही अल्पवयीन आहे.

या प्रकरणी नागपूर पोलिसांनी संबंधित कलमांनुसार, गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहे का? तसेच हे एक मोठं रॅकेट आहे का? या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Nagpur, Sex racket