मराठी बातम्या /बातम्या /nagpur /'शाळा विकणे आहे...!' कोरोनामुळे शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा, नागपूरात 32 शाळा विकायला काढल्या

'शाळा विकणे आहे...!' कोरोनामुळे शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा, नागपूरात 32 शाळा विकायला काढल्या

कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. जर शाळा विकण्याची वेळ संचालकांवर येत असेल तर शिक्षण व्यवस्थेला हा मोठा हादरा आहे.

कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. जर शाळा विकण्याची वेळ संचालकांवर येत असेल तर शिक्षण व्यवस्थेला हा मोठा हादरा आहे.

कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. जर शाळा विकण्याची वेळ संचालकांवर येत असेल तर शिक्षण व्यवस्थेला हा मोठा हादरा आहे.

नागपूर, 14 जून : कोविड नंतरच्या काळात जवळपास सर्व व्यवसाय पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र शाळा बंद असल्याने खाजगी शाळा प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या आर्थिक संकटामुळे नागपूर जिल्ह्यातील 32 शाळा संचालकांनी विकायला काढल्या आहे. सरकारने खाजगी शाळांच्या समस्येकडे त्वरीत लक्ष दिले नाही, तर भविष्यात अनेक शाळा विकायला निघण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (School is for sale)

सध्या देशभरात शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सध्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील कोरोनाची स्थिती कधी सुधारले, तिसरी लाट आली तर काय योजना कराव्या लागतील असे अनेक प्रश्न सर्वांसमोर आ वासून उभे आहेत. अनेक खासगी शाळांना तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार देणंही कठीण झालं आहे. परिणामी नागपुरात तर 32 शाळा विकायला काढल्याचं वृत्त आहे. आणि ही शिक्षण यंत्रणेसाठी खूप मोठा धक्का आहे. (School is for sale Corona disrupted the education system by selling 32 schools in Nagpur )

नागपूर जिल्ह्यात खाजगी शाळांच्या समस्या

सध्या नागपूरात 1612 खाजगी शाळा आहेत. यापैकी 160 सीबीएसई बोर्डाच्या आहेत. यापैकी 32 शाळा विकायला काढण्यात आल्या आहे.

हे ही वाचा-Nagpur Unlock : नागपूरमध्ये नियमावलीत बदल, दुकानं 5 तर बार वाजेपर्यंत सुरू!

शाळा विकायला काढण्यामागे काय आहे कारणं?

-कोविड नंतर आलेns आर्थिक संकट

-दोन वर्षांपासून पालकांकडून शाळेची फी भरण्यात टाळाटाळ केली जात आहे.

- नो स्कुल नो फी असं पालकांचे धोरण आहे.

- शासन आदेशानुसार पालकांना फी न देण्याची सूटही आहे.

किती आहे शाळांचा खर्च

-बिल्डिंगच्या खर्चाचा EMI-शिक्षकांचा पगार-नॉन टिचिंग स्टाफचा पगार- स्कुल बसचा EMI- इलेक्ट्रिक भाडे-मेंटनन्स खर्च- शालेय साहित्य खर्च

-CBSC बोर्डच्या अडीच हजार विद्यार्थी असलेल्या 1 ते 12 पर्यंत शाळेचा खर्च

-300 शिक्षकांच्या पगाराचा खर्च 70 लाख-110 नॉन टिचिंग स्टाफ यांचा पगार खर्च 12 लाख- इलेक्ट्रिक बिल 1.25 लाख (मासिक)- 20 स्कुलबसचा EMI 13 लाख (मासिक)- मेंटनन्स खर्च 7 लाख मासिक

-एकूण खर्च- 1 कोटी 3 लाख 25 हजार मासिक खर्च

-कोविडनंतर मार्च 2020 पासून शाळेचा उत्पन्न खर्च फक्त 20% - मागच्या दीड वर्षापासून 80% ने उत्पादनात घट

हे ही वाचा-मित्राकडून हत्येचा प्रयत्न; पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात

काय आहे शाळांची भूमिका?

-शाळा संचालक फी खर्चात 20 टक्के सूट देण्यास तयार आहे.

-कोविडमध्ये आई किंवा वडील यांचा मृत्यू झाला असेल तर त्या विद्यार्थ्याच्या पुढील पाच वर्षांचा शिक्षणाचा भार उचलण्यास शाळा तयार-

-नोकरी गेलेल्या पालकांना सरसकट फी न भरता टप्या टप्यात फी भरण्यास सूट देण्यात आली आहे

शासनाकडेकडे केल्या मागण्या

- पालकांनी फी न भरण्याचा शासन आदेश मागे घ्यावा अशी मागणी शाळांकडून करण्यात आली आहे. लोन EMI मध्ये व्याजात सूट आणि स्कुल बसच्या RTO टॅक्स मध्ये सूट, RTE चे पैसे त्वरित शाळांना द्यावे, अशा मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

जेपी इंग्लिश स्कुल या नावाने राजेंद्र दुधे यांच्या तीन शाळा आहे. मात्र कोविडपासून शाळेचा डोलारा चालवणे त्यांना अवघड झाले आहे. दोन सत्रापासून त्यांना पालकांकडून एज्युकेशन फि मिळत नसल्याने शाळा आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपली ब्रह्मपुरीची जेपी इंग्लिश स्कुल विकायला काढली आहे. कोविडनंतरच्या आर्थिक संकटामुळे नागपूर जिल्ह्यातील 32 शाळा शाळा संचालकांनी विकायला काढल्या आहे. सरकारने खाजगी शाळांच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिले नाही, तर भविष्यात अनेक शाळा विकायला निघण्याची भीती खाजगी शाळा संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Nagpur, School