काँग्रेस नेत्याच्या भेटीनंतर संजूबाबा पोहोचला नितीन गडकरींच्या निवासस्थानी!

काँग्रेस नेत्याच्या भेटीनंतर संजूबाबा पोहोचला नितीन गडकरींच्या निवासस्थानी!

नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी संजय दत्त शनिवारीच नागपुरात दाखल झाला होता. पण, शनिवारी भेट होऊ शकली नाही.

  • Share this:

नागपूर, 06 जून: बॉलिवूडचा सुप्रिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने आधी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्री मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेता संजय दत्त गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये मुक्कामी आहे. आज सकाळी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी संजय दत्त शनिवारीच नागपुरात दाखल झाला होता. पण, शनिवारी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर आज सकाळी ही भेट झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असं सांगण्यात आलं आहे.

काँग्रेस नेत्याच्या भेटीनंतर संजूबाबा पोहोचला नितीन गडकरींच्या निवासस्थानी!

त्यापूर्वी शनिवारी संध्याकाळी संजय दत्त ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे, नितीन राऊत यांच्या नागपूर (Nagpur) येथील निवास्थानी जाऊन संजय दत्त याने संपुर्ण कुटुंबाची भेट घेतली.

नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला होता. कोरोना परिस्थितीमुळे स्वागत समारंभ सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक मान्यवरांना या सोहळ्याला उपस्थितीत राहता आले नाही. त्यामुळेच संजय दत्त याने नितीन राऊत यांच्या नागपूर येथील निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

‘मार खाणाऱ्या निशानं कॅमेरे बंद का केले?’ करणचा घटस्फोटित पत्नीला सवाल

कुणाल राऊत आणि आकांक्षा या नवदाम्पत्याची भेट घेऊन लग्नाचा शुभेच्छा दिल्या. या भेटीत संजय दत्त याने नितीन राऊत कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.  संजय दत्तची ही भेट अत्यंत गोपनिय अशीच होती. डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा २१ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित  विवाह स्वागत समारंभ कोविड प्रादुर्भावामुळे रद्द झाल्याने त्यावेळेस त्यांना  येणे शक्य झाले नाही. आज त्यांनी नागपूर येथे नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षा यांस विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. ह्या छोटेखानी भेटीत संजय दत्त यांनी राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Published by: sachin Salve
First published: June 6, 2021, 1:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या