Home /News /nagpur /

राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह कोसळणार सरी, या जिल्ह्यांना इशारा

राज्यात पावसाचा मुक्काम वाढला; आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह कोसळणार सरी, या जिल्ह्यांना इशारा

Weather Forecast Today:राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा (Rainfall) मुक्काम वाढला आहे. येत्या तीन दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे.

    नागपूर, 12 जानेवारी: मागील तीन-चार दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. अशात राज्यात कोसळणारा पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा मुक्काम वाढला आहे. येत्या तीन दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने आज नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन ते तीन तासाच याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. दरम्यान वाऱ्यांचा वेगही अधिक राहणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा जोर (Heavy rainfall) सुरू असताना दुसरीकडे थंडीचा कडाका देखील वाढला (Cold in maharashtra) आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला (Temperature drop in maharashtra) आहे. 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) आणि पाचगणीत हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. महाबळेश्वरात आज पहाटे तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसजवळ जावून पोहोचला होता. त्यामुळे महाबळेश्वरात दवबिंदू गोठतील अशी स्थिती निर्माण झाली होती. हेही वाचा-उंदरांपासून विकसित झाला ओमायक्रॉन व्हेरिएंट? संशोधकांच्या दाव्याने वाढवली चिंता आज पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ नोंदला गेला आहे. पाचगणीत देखील किमान तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. खरंतर, दरवर्षी डिसेंबर महिन्यात वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठत असतात. पण यावर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अशात आज पहाटे महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ पोहोचला आहे. त्यामुळे दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली होती. हेही वाचा-कोरोना नियम मोडल्याबद्दल 4 वर्षांचा कारावास, उच्चपदस्थांना फोडावी लागणार खडी याशिवाय आज पुण्यात राजगुरूनगर याठिकाणी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येथील तापमान 10.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यापाठोपाठ माळीण (10.4), पाषाण  (10.5), हवेली (10.7), एनडीए (11.1), निमगीरी (11.1), शिवाजीनगर (11.2) आणि तळेगाव येथे 11.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात अन्य ठिकाणचं तापमान 11 ते 17 अंशच्या दरम्यान आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IMD FORECAST, Maharashtra, Nagpur, Weather forecast

    पुढील बातम्या