Home /News /nagpur /

6 जानेवारीपासून राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून High Alert

6 जानेवारीपासून राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून High Alert

Weather Forecast Today: महाराष्ट्रात मात्र 6 ते 8 जानेवारी दरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे.

    नागपूर, 04 जानेवारी: मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी (cold in maharashtra) पडली होती. किमान तापमानाचा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्यानंतर, आता राज्यात पुन्हा किमान तापमानात (temperature in maharashtra) किचिंत वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडी कायम राहणार आहे. पण त्यानंतर राज्यातील किमान तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर भारतात देखील पुढील सात दिवस थंडीची लाट (Cold wave) येणार नसल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. खरंतर, मागील तीन चार दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीसह पाऊस आणि बर्फवृष्टी (Rainfall with Snowfall) होत आहे. पुढील आणखी काही दिवस देशात हीच स्थिती कायम राहणार आहे. उद्यापासून पुढील चार दिवस देशात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट (Yellow) जारी केला आहे. हेही वाचा-Office Guidelines: कोरोनाचं थैमान, केंद्राकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स जाहीर येत्या काही दिवसांत संबंधित ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या वायव्य आणि मध्य भारतावर 2 सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तयार झाले आहेत. त्यामुळे 9 जानेवारीपर्यंत वायव्य आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह बर्फवृष्टीची शक्यता आहे. 07 जानेवारीला पंजाब,पूर्व-उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तर 7 आणि 8 जानेवारीला पूर्व मध्य प्रदेशात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुढील 6-7 दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हेही वाचा-Coronavirus: "...तर मुंबईत Lockdown लावणार" मनपा आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र 6 ते 8 जानेवारी दरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. 6 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात तर 7 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. या दोन दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी 8 जानेवारीला मात्र विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 जानेवारी रोजी हवामान खात्याने बुलडाणा, अमरावती, नागपूर, अकोला आणि वर्धा या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या