मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

Weather Forecast: पुढील 4 दिवस विदर्भाला झोडपणार पाऊस; 11 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

Weather Forecast: पुढील 4 दिवस विदर्भाला झोडपणार पाऊस; 11 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

आज मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील एकूण अकरा जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार आहेत.

आज मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील एकूण अकरा जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार आहेत.

Weather in Maharashtra Today: पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची (Rain with thunderstorm in vidarbha) शक्यता हवामान खात्याकडून खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नागपूर, 27 ऑगस्ट: गेल्या आठवड्यात राज्यात पावसानं (Rain in Maharashtra) पूर्णपणे उघडीप घेतली होती. पण दरम्यानच्या कालावधीत पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार व्हायला सुरुवात झाली आहे. सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.

पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची (Rain with thunderstorm in vidarbha) शक्यता हवामान खात्याकडून खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील एकूण अकरा जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार आहेत. आज बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट (IMD Give Yellow Alert) जारी केला आहे.

हेही वाचा-वाह! कमाल, मुंबईत 30 हजार बेड अन् रुग्ण फक्त 500 खाटांवर

संबंधित अकरा जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहेत. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी लांबचा प्रवास टाळावा तसेच मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे.

हेही वाचा-कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय; जगात या 3 देशांत अजून Vaccination सुरूच नाही झालं

आजपासून तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी विदर्भासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात देखील पावसाच्या सरी कोसळणार आहेत. रविवारी 29 ऑगस्ट रोजी वर नमूद केलेल्या अकरा जिल्ह्यांसोबत उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यातही मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. तर सोमवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांत वरुणराजा गरजणार आहे.

First published:

Tags: Maharashtra, Nagpur, Vidarbha, Weather forecast