Home /News /nagpur /

गणेश मंडळांच्या वर्गणीला ठाकरे सरकारचा हातभार, वीज पुरवठ्याबाबत मोठी घोषणा

गणेश मंडळांच्या वर्गणीला ठाकरे सरकारचा हातभार, वीज पुरवठ्याबाबत मोठी घोषणा

सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील.

  नागपूर, 4 सप्टेंबर : सर्व गणेश भक्तांना लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहुल लागली आहे. गणेशोत्वासाठी (Ganeshotsav ) जोरदार तयारी सुरू आहे. अशातच ठाकरे सरकारने (mva government) सुद्धा गणेश भक्तांच्या वर्गणीत भर घातली आहे.  गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी केली आहे. 'गणेशोत्सव पर्व शांततेत पार पडावा, यासाठी नागपुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांचीबैठक आज पोलीस जिमखाना येथे पार पडली. नागपूर शहरातील सर्व पोलीस झोनमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

  मुलाला वाचवताना बापलेकासह भाच्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, बीडमधील घटना

  यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले की, 'सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील. सार्वजनिक गणेश मंडळे या काळात तात्पुरता वीज पुरवठा घेतात. गणेशोत्सव काळात वापरलेल्या विजेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली. CSIR-NCL Recruitment: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे नोकरीची मोठी संधी कोरोनाचे संकट टळलेले नसल्याचे स्पष्ट करून डॉ. राऊत म्हणाले, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव शहरात झालेला आहे. पुढील 15 दिवस धोक्याचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही स्थिती विचारात घेऊन गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजना आखल्या पाहिजेत व राज्य सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या