मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नक्षलवादी चळवळीत मोठे बदल; पोलिसांच्या हाती लागलेल्या 42 पुराव्यांमुळे अखेर गुपित आलं समोर

नक्षलवादी चळवळीत मोठे बदल; पोलिसांच्या हाती लागलेल्या 42 पुराव्यांमुळे अखेर गुपित आलं समोर

या पुराव्यांमधून मोठा खुलासा झाला आहे.

या पुराव्यांमधून मोठा खुलासा झाला आहे.

या पुराव्यांमधून मोठा खुलासा झाला आहे.

नागपूर, 4 ऑगस्ट : सध्या नक्षवाद्यांचा (Naxals Movement) शहीद सप्ताह सुरू आहे. त्यामुळे नक्षल चळवळीतील अनेक गुपित पुढे आली आहे. सामान्य शहरी लोक हे सध्या अॅमेझॉन आणि नेटाफिल्क्सच्या जाळ्यात अडकलेले असताना जंगलातून छुप्या युद्धाच्या माध्यमातून आपली हिंसक चळवळ चालवणारे माओवादी सुद्धा आता आपापल्या करमणुकीसाठी डिजिटल साधनांचा वापर करत असल्याचे पुढे आले आहे. डिजिटल युगात माओवादी बरेच पुढे गेल्याचे पोलिसांच्या लक्षात येण्याचे कारण म्हणजे पोलिसांच्या हाती लागलेले त्यांचे 42 पेन ड्राइव्हसचे (Police have seized 42 pen drives of Naxals) मोठे घबाड!

आता नक्षली फक्त एके - ४७ आणि एक्सप्लोसिव्ह घेऊन फिरत नाहीत तर पेन ड्राइव्हस ही बरोबर असतात. सोबतच पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करत असल्याचे नक्षल विरोधी अभियानाचे उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

माओवाद्यांच्याही डिजिटल शाळा

माओवाद्यांमध्येदेखील आता डिजिटल शाळा भरू लागल्या आहेत. आता त्यांना लॅपटॉपवर छुप्या युद्धासाठी लागणारे ट्रेनिंग, व्हिडिओमार्फत देण्यात येत आहे. रोज जंगलात त्यांचे ट्रेनिंग तर होत असतंच, मात्र आता छुप्या युद्धात कसा पोलिसांवर विजय मिळवला जाऊ शकतो ह्याचे विशेष व्हिडियो त्यांना दाखवल्या जातात. सोबतच पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा देखील वापर करू लागले आहे.

हे ही वाचा-इमारतीवरून नवजात बालिकेला फेकलं; विरारमधील क्रूरतेचा कळस गाठणारी घटना

सामाजिक फ्रंटवरही काम

तसेच नक्षलवादी सामाजिक फ्रंटवर पण काम करत असल्याचे पुढे आले आहे. ठिकठिकाणी शहरी नक्षलवाद किंवा दर्शनी संघटनांच्या माध्यमातून गावातल्या लोकांना सामील करून जे कार्यक्रम घेतल्या जातात त्याचे व्हिडिओ फिल्ड नक्षल्यांना दाखवल्या जात आहे. ज्यामुळे चळवळीतील सर्वच घडामोडींबाबत जंगलातील केडर ही अपडेटेड राहू शकेल. सोबतच संघटना असणाऱ्या चेतना नाट्य मंचाचे नाच-गाणी, क्रांतिकारी विचारांचे नाट्य आदी सामील केलेले दिसत आहे. यातून करमणुकीच्या माध्यमासोबत स्थानिक वेगवेगळे मुद्दे घेऊन स्थानिकांना शासनाच्या विरोधात चीड निर्माण करायचा प्रयत्न नक्षल्याचा असतो व त्यासाठी ते आता तंत्रज्ञानाचा वापरात वाढवत असल्याचे पुढे आले आहे.

असे असले तरी पोलीस देखील आपल्या नक्षलविरोधी अभियानात या सर्व बाजूचा विचार करून काम करत असते. नक्षलवाद्यांनी जरी तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली असती तर त्याची तोड सोबत ठेवून पोलिसांचे नक्षल विरोधी अभियान सुरू आहे.

First published:

Tags: Gadchiroli, Nagpur