Home /News /nagpur /

"बच्चो की सलामती चाहते हो तो एक करोड दो" उच्चशिक्षित महिलेनं दिली धमकी; अखेर समोर आलं धक्कादायक सत्य

"बच्चो की सलामती चाहते हो तो एक करोड दो" उच्चशिक्षित महिलेनं दिली धमकी; अखेर समोर आलं धक्कादायक सत्य

वेबसीरिज बघून एका उच्चशिक्षित महिलेनं डॉक्टरांच्या मुलांच्या अपहरणाची धमकी देणारं पत्र पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे.

    नागपूर, 17 जून  :  आजकालच्या काळात वेबसीरिजचं (Latest web series) वेड सर्वांनाच आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांवरच वेबसिरीजचा पगडा आहे. मात्र आता या वेबसिरीज मनोरंजना इतपतच मर्यादित राहिल्या नाहीत.  वेबसीरिजमधील काही दृश्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठीही (Crimes) करण्यात येत आहे. असाच धक्कादायक प्रकार नागपुरात (Nagpur crime news) घडला आहे. वेबसीरिज बघून एका उच्चशिक्षित महिलेनं डॉक्टरांच्या मुलांच्या अपहरणाची (Kidnaping of child)  धमकी देणारं पत्र पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला गरीब असेल म्हणून पैशांसाठी तिनं अपहरणाचं पत्र लिहिलं असावं असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण असं अजिबात नाही. आरोपी महिलेचा पती सरकारी नोकरीत वरच्या पदावर आहे. तसंच महिलेच्या नवऱ्याचा पगार साधारणतः एक लाखाच्या वर आहे. मग तरीही या महिलेनं असं का केलं असावं? हे वाचा -Weather Alert: मुंबईत गडगडाटासह बरसणार तर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट नक्की काय घडलं 11 जून रोजी डॉ राजश्री पांडे यांच्या नावानं क्लिनिकमध्ये एक कुरियर आलं. डॉक्टर राजश्री यांनी 12 जूनला ते पत्र वाचलं. या पत्रात त्यांच्या दोन्ही मुलांच्या अपहरणाची धमकी देत एकूण 1 कोटीची खंडणी मागण्यात आली होती. डॉ राजश्री यांनी लगेच त्यांच्या पती डॉ तुषार पांडे यांना माहिती दिली. एक कोटींची खंडणी देणे शक्य नसल्यामुळे त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पत्र वाचताच हे पत्र कोणत्या सराईत गुन्हेगाराचं नाही हे पोलिसांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच शोध सुरू केला. 'जर तुमच्या लहान लहान मुलांना सुखरूप बघायचं आहे तर एक कोटी रुपये द्या' असं त्या पत्रात लिहिलं होतं. हे पत्र 8 जून रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास डीटीडीसी कुरियर कंपनीच्या कार्यालयातून पाठवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिथलं CCTV फुटेज पोलिसांनी तपासलं. त्यावेळी एका दुचाकीवर एक महिला आणि तिची लहान मुलगी कुरिअर कंपनीत आल्याचं पोलिसांना दिसून आलं.यामुळे पोलिसांचा संशय दृढ झाला. हे वाचा -'राज्याला तेवढी गोड भेट द्या', संजय राऊतांनी दिल्या राज्यपालांना हटके शुभेच्छा व्यवसायासाठी काहीही.... तपासादरम्यान पोलिसांना संबंधित दुचाकी आणि महिला दोन्ही आढळून आल्या. संबंधित महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिनं गुन्हा कबूल केला. स्वत:चा मोठा .व्यवसाय सुरू करण्यासाठी ही अपहरणाची धमकी दिल्याचंही तिनं कबुल केलं. हे सर्व वेबसिरीज बघून केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला काही महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. त्यावेळी तिनं नागपूरच्या मनीष नगरमधील डॉक्टर तुषार पांडे आणि यांची पत्नी राजश्री पांडे यांच्याकडेच उपचार घेतले होते.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Crime news, Nagpur

    पुढील बातम्या