मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

विमान हवेत असतानाच पायलटला Heart Attack; बांग्लादेशी विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग

विमान हवेत असतानाच पायलटला Heart Attack; बांग्लादेशी विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग

पायलटलाच हृदयविकाराचा झटका आल्यानं संबंधित विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं आहे.

पायलटलाच हृदयविकाराचा झटका आल्यानं संबंधित विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं आहे.

विमान हवेत असताना पायलटला हृदयविकाराचा झटका (Pilot Suffers Heart Attack Mid-Air) आल्याची घटना समोर आली आहे. पायलटलाच हृदयविकाराचा झटका आल्यानं संबंधित विमानाचं नागपूरात आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे.

    नागपूर, 27 ऑगस्ट: ओमानची राजधानी मस्कटहून ढाका येथे जाणाऱ्या बांग्लादेशी विमानातील पायलटला विमान हवेत असतानाच हृदयविकाराचा झटका (Pilot Suffers Heart Attack Mid-Air) आल्याची घटना समोर आली आहे. पायलटलाच हृदयविकाराचा झटका आल्यानं संबंधित विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं आहे.  संबंधित विमान रायपूरजवळ होतं. यावेळी आपत्कालीन लँडिंगसाठी कोलकाता एटीसीशी संपर्क साधला असता आज नागपूर विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing in Nagpur) करण्यात आलं आहे. पायलटनं कोलकाता एटीसीशी संपर्क साधला असता, त्यांना जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. नागपूर हे सर्वात जवळचं विमानतळ असल्यानं संबंधित विमानाचं नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे. फ्लाइट ट्रॅकिंग अॅप FlightRadar24 वरील आकडेवारीनुसार, संबंधित विमान बोईंग 737-8 असल्याची माहिती समोर आली आहे. पण याबाबतचा अधिक तपशील अद्याप समोर आला नाही. हेही वाचा-मोठी दुर्घटना: कारवर कोसळलं हेलिकॉप्टर; थरारक घटनेचा VIDEO आला समोर भारतानं अलीकडेच बांग्लादेशी एअरलाइन्सला भारतासोबत विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. भारतातील कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे बराच काळ संबंधित विमान उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले होते. यानंतर दोन्ही देशांमधील हवाई प्रवासाला सरकारांनी परवानगी दिली होती. हेही वाचा-काबूल विमानतळावरील हल्ल्याचं सावट कायम, अमेरिकेनं केला खळबळजनक दावा सध्या ढाका ते कोलकाता दरम्यान आठवड्यातून तीन उड्डाणं सुरू करण्यात आली आहेत. तर ढाका-दिल्ली या हवाई मार्गावर दोन उड्डाणं चालवली जात असल्याची माहिती बुधवारी बांग्लादेशी विमान प्रशासनाकडून देण्यात आली होती. कोलकातासाठी रविवार, मंगळवार आणि गुरुवारी उड्डाणं घेतली जातील तर दिल्लीसाठी रविवार आणि बुधवारी विमानसेवा चालवली जाईल, असंही संबंधित निवेदनात म्हटलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nagpur

    पुढील बातम्या