Home /News /nagpur /

हॉस्टेलमधून सुरू झालेला चोरीचा प्रवास जेलमध्ये संपला; डबल MA केलेल्या पाकिटमार तरुणीला अखेर अटक

हॉस्टेलमधून सुरू झालेला चोरीचा प्रवास जेलमध्ये संपला; डबल MA केलेल्या पाकिटमार तरुणीला अखेर अटक

Crime in Nagpur: नागपुरातील एका उच्च शिक्षित तरुणीला चक्क चोऱ्या करण्याचं व्यसन लागलं आहे. सधन कुटुंबातील असून देखील तिने गेल्या काही दिवसांत तब्बल 20 ठिकाणी चोऱ्या (20 thefts) केल्या आहेत.

    नागपूर, 04 जानेवारी: कुणाला कोणत्या गोष्टींचं व्यसन असेल काही सांगता येत नाही. नागपुरात (Nagpur) एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका उच्च शिक्षित तरुणीला चक्क चोऱ्या (well educated woman thief) करण्याचं व्यसन लागलं आहे. गेल्या काही दिवसांत या तरुणीने नागपुरात तब्बल 20 ठिकाणी चोऱ्या (20 thefts) केल्या आहेत. केवळ व्यसन आणि मौज मजा करता यावी म्हणून ही तरुणी चोऱ्या करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. उच्च शिक्षित असलेल्या या तरुणीची घरची परिस्थिती देखील सधन असूनही तिने चोरीचा उद्योग सुरू केला होता. अखेर पोलिसांनी तिला अटक (accused woman arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असणारी ही तरुणी केवळ 27 वर्षांची आहे. घरची आर्थिक स्थिती सधन आहे. तसेच ती डबल एम. ए. केलं आहे. तिला मराठी, इंग्रजीसह आणखी तीन ते चार भाषा बोलता येतात. असं असूनही काही वर्षांपूर्वी तिला चोरीची सवय लागली अन् तिने नागपूर शहरात धुमाकूळच घातला आहे. संबंधित पाकिटमार तरुणीने गर्दीच्या ठिकाणी महिलेच्या पर्समधून रोख रक्कम आणि दागिन लंपास करण्याचा सपाटाच लावला. हेही वाचा-तरुणीनं Video Call वर उतरवले कपडे, मग सुरू झाला Blackmail चा खेळ आरोपी तरुणी चोऱ्या करण्यात इतकी पटाईत आहे की, तिची कला पाहून पोलीस देखील हैराण झाले आहेत. ती नेमकी चोऱ्या कशी करते, याचं प्रात्यक्षिक पोलिसांनी करून घेतलं होतं. तिने क्षणात हातचलाखी करत चोरीचा अस्सल नमुना पोलिसांपुढे सादर केला आहे. 'उच्चशिक्षित आहेस, चांगल्या घरची आहे, मग चोऱ्या कशासाठी करते? असा प्रश्न तिला पोलिसांनी विचारला असता, ‘आप ये नहीं समझेंगे’ असं उत्तर तरुणीने पोलिसांना दिलं आहे. हेही वाचा-21 वर्षीय तरुणीवर भरदिवसा सामूहिक बलात्कार; तिघांनी आळीपाळीने दिल्या नरक यातना खरंतर, काही वर्षांपूर्वी हॉस्टेलमध्ये राहात असताना, कानपूरमधील एका उच्चभ्रू तरुणीने तिला चोऱ्या करण्याबाबत शिकवलं होतं. त्यानंतर पुढील काही दिवस आरोपी तरुणीने तिच्यासोबत काही ठिकाणी चोऱ्या केल्या. पण चोरीचा माल वाटून घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर संबंधित तरुणीनं स्वत:च चोऱ्या करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षात तिने तब्बल 20 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. चोरीतून मिळालेली रक्कम तिने मौजमजेसाठी खर्च केली आहे. पण तब्बल वीस लाखांचं सोनं तिने घरातील एका डब्ब्यात लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सोनं विकायला गेलो तर, आपलं बिंग फुटेल या भितीपोटी तिने सोनं विकलं नव्हतं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Theft

    पुढील बातम्या