"चुकीला माफी नाही, परमबीर आणि वाझे यांच्या भूमिका संशयास्पद" : अनिल देशमुख

Anil Deshmukh on Param Bir Singh and Sachin Vaze: अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे याच्या भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

नागपूर, 4 मे: मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे (Sachin Vaze) याला स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आल्यावर मनसुख हिरेण (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं. त्यानंतर परमबीर सिंह (Param Bir Singh) यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. या घटनेनंतर परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा गंभीर आरोप केला. या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनाही आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता या प्रकरणावरुन अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे या दोघांची भूमिका संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं, मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना परमबीर सिंह यांनी अनेक गंभीर चुका केल्या आहेत. मुंबईत जिलेटिनने भरलेली गाडी ठेवण्याचे प्रकरण असो किंवा त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेण मृत्यू प्रकरण असो या दोन्ही बाबतीत परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भूमिका संशयास्पद आहेत.

सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव

चुकीला माफी नाही

अनिल देशमुख यांनी पुढे म्हटलं, परमबीर सिंह यांनी केलेल्या चुकांना माफी नाही आणि त्यामुळेच मी त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा वरून दूर केले होते. त्याचाच राग मनात धरून परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले. एका वर्तमानपत्राच्या कार्यक्रमातही मी त्याच संदर्भात भाष्य केले होते.

...म्हणून उच्च न्यायालयात याचिका

माझ्या तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर भ्रष्टाचाराचे असे आरोप झालेले नाही. त्यामुळे मला न्याय मिळावा या हेतूने मी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंह जेव्हा पदावर होते, तेव्हा त्यांनी कुठलेच आरोप किंवा घडलेल्या प्रकरणाबद्दल भाष्य केलेले नाही, त्यांना पदावरून जेव्हा दूर करण्यात आले त्याच्यानंतर त्यांनी आरोप करणे सुरू केले.

Published by: Sunil Desale
First published: May 4, 2021, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या