मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नागपूरात हत्या सत्र सुरूच; SRPFमधून निवृत्त झालेल्या महिलेसह एकाची हत्या

नागपूरात हत्या सत्र सुरूच; SRPFमधून निवृत्त झालेल्या महिलेसह एकाची हत्या

नागपूरात दोन जणांची एकाच दिवशी हत्या झाल्याची घटना समोर आली आहे

नागपूरात दोन जणांची एकाच दिवशी हत्या झाल्याची घटना समोर आली आहे

नागपूरात दोन जणांची एकाच दिवशी हत्या झाल्याची घटना समोर आली आहे

नागपूर, 14 मे: नागपूरात गुन्हेगारीचं सत्र (Crime incident in Nagpur) सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आज दिवसभरात नागपूरात दोघांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. एकाच दिवशी दोन हत्या (two murdered) झाल्याने नागपूरात खळबळ उडाली आहे. आज हत्या झालेल्या घटनांमध्ये एका सेवानिवृत्त महिलेचाही समावेश आहे.

एसआरपीएफमधून निवृत्त महिलेची हत्या

नागपुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Nagpur MIDC police) हद्दीत असलेल्या सप्त नगर परिसरात आज एका वयोवृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मृतक महिलेचं नाव विजया तीवलकर असे आहे. विजया तीवलकर या एसआरपीएफमध्ये कार्यरत होत्या आणि त्या निवृत्त झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, विजया यांची गळा आळून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

वाचा: सख्खं नातंही हरलं! कोरोनाबाधित बहिणीचा मृत्यू होताच भावानं हडपले 12 लाखाचे दागिने

दुसऱ्या घटनेत नागपुरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधी गेट जवळ शहानवाज नावाच्या गुंडाची हत्या करण्यात आली आहे. शहानवाज या गुंडाची धारधार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

शहानवाज हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार होता. गुन्हेगार असल्याने विरोधी टोळी कडून हत्या केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. कोतवाली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही हत्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. विजया तीवलकर यांची हत्या का आणि कुणी केली याचाही पोलीस तपास करत आहेत. एकूणच एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने नागपूरात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime, Nagpur