नागपूरात काकाचा 7 वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार; अन्य महिलांचीही काढायचा छेड

नागपूरात काकाचा 7 वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचार; अन्य महिलांचीही काढायचा छेड

Crime in Nagpur: नागपूरात एका व्यक्तीनं आपल्या सात वर्षीय पुतणीवरच (Niece) लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नागपूर, 02 जुलै: नागपूरात एका व्यक्तीनं आपल्या सात वर्षीय पुतणीवरच लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी काकानं दारुच्या नशेत आपल्या अल्पवयीन पुतणीवर (Niece) लैंगिक अत्याचार (attempt to rape) करण्याचा प्रयत्न केला. पण पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यामुळे आरोपी काकाचे विकृत चाळे उघड झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी नराधम काकाला चांगलाच चोप (Beat) दिला आहे. यानंतर स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं आहे.

संबंधित घटना नागपूर शहराच्या सीमेवर असणाऱ्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. काल सायंकाळी आरोपीनं दारुच्या नशेत आपल्या सात वर्षाच्या पुतणीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नागरिकांनी आरोपीला काकाला अर्धनग्न करून मारहाण केली आहे.

हेही वाचा-धक्कादायक! महाराष्ट्रात चार तासात अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून गँगरेप

आरोपी काका हा दारुच्या नशेत असल्यानं स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं आहे. संबंधित आरोपीनं केवळ आपल्या पुतणीवरच नव्हे, तर परिसरातील अन्य महिलांचीही छेड काढण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील अनेकांनी संबंधित आरोपीचा कायमचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपी काका विरोधात नेमक्या कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या घटनेचा पुढील तपास वाडी पोलीस करत आहेत.

हेही वाचा-'मित्रांसोबत संबंध ठेव किंवा पैसे दे'; BFच्या धमकीनंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

नागपुरात अल्पवयीन मुलीवर गँगरेप

दुसऱ्या एका घटनेत, नागपूरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. नागपुरात (Nagpur) केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीवर (16-year-old girl) गँगरेप (Gang Raped) झाला आहे. धक्कादायक म्हणजेच या गँगरेपमध्ये जवळपास सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं समजतंय. गुरुवारी घरच्यासोबत क्षुल्लक वाद झाल्यानं पीडित मुलगी घर सोडून गेली. त्यानंतर ही घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

Published by: News18 Desk
First published: August 2, 2021, 4:21 PM IST

ताज्या बातम्या