Home /News /nagpur /

Maharashtra Nagar Panchyat Election Result 2022 : यशोमती ठाकूरांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात राणा दाम्पत्य अयशस्वी, तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता

Maharashtra Nagar Panchyat Election Result 2022 : यशोमती ठाकूरांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात राणा दाम्पत्य अयशस्वी, तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता

Maharashtra Nagar Panchyat Election Result 2022 : यशोमती ठाकूर यांना यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा आणखी जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसला तब्बल 12 जागांवर यश मिळालं आहे.

    अमरावती, 19 जानेवारी : अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावती तिवसा नगरपंचायत निवडणुकीच्या (Newasa Nagar Panchayat Election Results)  प्रचारादरम्यान प्रचंड घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेस नेत्या-अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि आमदार रवी राणा यांच्यात प्रचंड संघर्ष बघायला मिळाला होता. रवी राणा यांनी या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांना प्रचारादरम्यान पत्नी खासदार नवनीत राणा यांचा देखील मोलाचं सहकार्य मिळालं होतं. पण तरीही तिवसा नगरपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवण्यात मंत्री यशोमती ठाकूर यांना यश मिळालं आहे. विशेष म्हणजे यशोमती ठाकूर यांना यावेळी गेल्या निवडणुकीपेक्षा आणखी जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसला तब्बल 12 जागांवर यश मिळालं आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेला 4 तर वंचितला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. अखेरच्या क्षणी निकाल पालटला, कुडाळमध्ये नारायण राणेंना शिवसेनेचा 'दे धक्का' निकालाची सविस्तर आकडेवारी : काँग्रेस-12 शिवसेना-04 वंचित-01 राष्ट्रवादी-0 भाजप-0 अपक्ष-0 रोहित पाटलांनी एकहाती सत्ता मिळवली संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये झाली होती. कर्जत निवडणुकीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज विजय, रोहित पवारांचं निर्विवाद वर्चस्व माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती. अत्यंत या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायती वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती
    First published:

    Tags: Election, Maharashtra politics, Yashomati thakur

    पुढील बातम्या