Lockdownमुळे नोकरी गेली; हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या तरुणाने पोलीस वसाहतीतच केली चोरी

Lockdownमुळे नोकरी गेली; हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या तरुणाने पोलीस वसाहतीतच केली चोरी

Nagpur Crime: पोलीस वसाहतीत तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्येच चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • Share this:

नागपूर, 2 जून: नागपूरमध्ये गुन्हेगार नागपूर पोलिसांची (Nagpur Police) नाचक्की करायची एकही संधी सोडत नाही. आता तर चोरट्याने चक्क पोलीस वसाहतीतील वस्तूंवर हात साफ (Theft in Police colony) केला आहे. पाचपवली पोलीस स्टेशनला लागून असलेले हे पोलीस वसाहत असल्यामुळे नागपूरमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नाही का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या ही पोलीस वसाहत कोविड केअर सेंटरसाठी (Covid care center) वापरली जात आहे.

येथे काम करणाऱ्या पोलिसांना जेव्हा लक्षात आले की पोलीस वसाहतीमधील वस्तू एक-एक करत चोरीला जात आहेत त्यानंतर पोलिसांनी यावर पाळत ठेवली. राजीव उंदिरवाडे (Rajeev Undiarvade) हा पिशवीत काही तरी गुपचूप घेऊन असल्याचे पोलिसांना दिसल्यानंतर त्याची चौकशी केली गेली. तापसणीत त्याच्या पिशवीत फॅन आढळून आले. त्यानंतर या संपूर्ण घटनेचा भांडाफोड झाला.

बायकोला माहेरी नेल्याचा घेतला विचित्र बदला; जावयाने सासूला टार्गेट करत केलं धक्कादायक कृत्य

राजीव उंदिरवाडे याच्याकडून एकूण 23 सिलिंग फॅन जप्त करण्यात आले असून पाचपवली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजीव येथे कॅन्टींगमध्ये काम करत असल्याने त्याला सर्व पोलीस वसाहतीत इंत्यंभूत माहिती होती. त्याचाच त्याने फायदा उचलला. त्याने या पोलीस वसाहतीतील फॅनसह, नळ आणि इतर साहित्य चोरून नेले. सोबतच कोविड केअर सेंटरमधील बेड आणि गादीवर देखील त्याने हात साफ केले.

राजीव उंदिरवाडे हा उच्च शिक्षित असून त्याने हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. पण त्याने ज्या ठिकाणी चोरी केली ती पोलीस वसाहत असून पाचपवली पोलीस स्टेशनच्या सुरक्षा भिंतीला लागून असल्याने पोलीस देखील राजीवच्या धाडसाने चक्रावून गेले. पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 22 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीने आणखी कोण कोणत्या वस्तूची चोरी केली आणि चोरीचा माल कुठे विकला याचा शोध घेत आहेत.

First published: June 2, 2021, 5:29 PM IST

ताज्या बातम्या